शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

नागपूर HSC 2018; दृष्टिदोषाला हरविणारी ‘मनिषा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 10:57 IST

साधारण शेतमजुरी करणाऱ्या आईवडिलांची ती मुलगी. त्यातही जन्माने आलेला दृष्टिदोष तिची परीक्षा घेणारा. मात्र विपरीत परिस्थितीने मोडेल ती ‘मनिषा’ कसली?

ठळक मुद्दे८१ टक्के गुणांचे नेत्रदीपक यशसंगीत शिक्षिका होण्याचा दृढनिश्चय

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारण शेतमजुरी करणाऱ्या आईवडिलांची ती मुलगी. त्यातही जन्माने आलेला दृष्टिदोष तिची परीक्षा घेणारा. एका डोळ्याचा २५ टक्के प्रकाश तिला आधार होता, पण सायंकाळ झाली की, तीही साथ सुटायची. मात्र विपरीत परिस्थितीने मोडेल ती ‘मनिषा’ कसली? त्याऐवजी आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून ध्येय गाठण्यासाठी झगडणारी ती होती. तिचे हे परिश्रम बारावीच्या परीक्षेतून फळाला आले आहे. मेहनतीवर विश्वास ठेवणारी ही मुलगी म्हणजे मनिषा चांदेकर. एलएडी महाविद्यालयात शिकणाºया मनिषाने दृष्टिदोषाला पराभूत करीत कला शाखेत ८१ टक्के गुणांसह नेत्रदीपक यश मिळविले आहे.वर्धा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर राजीव चांदेकर यांची मोठी मुलगी मनिषा. अभ्यासातील तिचे कौशल्या लक्षात घेउन वडिलांनी तिला नागपूरला पाठविले. तिनेही आईवडिलांचा विश्वास सार्थ करीत परिश्रमाची जोड दिली. शासकीय वसतिगृहात राहणाºया मनिषाच्या प्रामाणिक अभ्यासाला एलएडी कॉलेजच्या शिक्षकांनीही मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे सहकार्य मनिषाने मिळविलेल्या ८१ टक्के गुणात दिसून येत आहे. लोकमतशी बोलताना मनिषाने तिच्या अभ्यासाचा प्रवास उलगडला. दररोज सहा ते सात तास अभ्यास करायचा, असे मनाशी पक्के केले होते. बहुतेक अभ्यास ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या मदतीने आणि अभ्यासाचे रेकार्डिंग ऐकूनच केल्याचे तिने सांगितले. कॉलेजमध्ये शिक्षकांचे क्लासेस सुटणार नाही याची काळजी घेतली. सायंकाळ झाली की डोळ्यात सारखी जळजळ व्हायची. त्यामुळे अभ्यास करणेही शक्य होत नव्हते. म्हणून रात्री अभ्यास करण्यापेक्षा सकाळी उठून नियमितपणे अभ्यास करण्याची सवय लावली. परीक्षेत लेखनिकाच्या मदतीने पेपर सोडविले. यश मिळेल हा विश्वास नक्कीच होता. आईबाबांचा विश्वास सार्थ ठरला याचे समाधान असल्याची भावना तिने व्यक्त केली.मामा गाण गात असल्याने लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली. खरे तर मनावर असलेले दृष्टिदोषाची निराशा दूर करण्यात संगीताचे सहकार्य मिळाले. त्यामुळे संगीत शिक्षिका म्हणून याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा मनिषाने व्यक्त केली.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८