शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांचा जीव कुत्र्यांमुळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:38 IST

प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे.

ठळक मुद्देरुग्णालयात २० वर मोकाट कुत्री : वॉर्डापासून ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे. ही कुत्री रुग्णांना जिथे ठेवले जाते त्या वॉर्डाच्या परिसरापासून ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत सर्वत्र दिसून येतात. काही मनोरुग्ण या कुत्र्यांच्या मागे धावतात, त्यांंना पकडतात, अशा वेळी ही कुत्री त्यांना चावा घेण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण अशा गोष्टी सांगत नाही. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे, मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे.वाढत्या ताणतणावामुळे स्क्र ीझोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या वाढत आहे. सध्या प्रादेशिक मनोरुग्णालयात सुमारे सहाशेवर पुरुष व महिला रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु वेड्यांकडे काय लक्ष द्यावे, याच भावनेतून रुग्णालयाचा कारभार अद्यापही सुरू असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात दोन मनोरुग्णाचा गळा दाबून हत्या व एका अल्पवयीन रुग्णावर झालेल्या अत्याचारामुळे रुग्णालय प्रशासन पुरते हादरून गेले आहे. यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू असताना रुग्णाच्या नोंदणी शुल्काचा घोटाळा समोर आला आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष रुग्णालयाकडे लागले आहे.रुग्णालयातील आतील बारीकसारीक माहितीही बाहेर येऊ लागली आहे. नुकताच एका रुग्णाचा नातेवाईक रुग्णाला भेटायला रुग्णालयात गेला असताना त्याचे स्वागत तेथील कर्मचाºयाने न करताच मोकाट कुत्र्यांनी केले. रुग्णालयाच्या दारापासून ते रुग्णाच्या वॉर्डापर्यंत सर्वत्र कुत्री त्यांना दिसून आली. काही रुग्ण तर या कुत्र्यांच्या मागे धावतानाही दिसले. अशा वेळी कुत्र्यांनी चावा घेतल्यास आणि रुग्णाने याची माहिती कुणाला न दिल्यास रॅबीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्वच्छतेचाही विषय आहे, असेही त्या नातेवाईकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष का?मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत असली तरी रुग्णालय प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. बाह्यरुग्ण विभागात तर एका कुत्र्याने पिल्ले दिले असून, ती आपल्या पिल्ल्यांसह तिथेच राहते. मात्र कर्मचाºयांपासून ते वरिष्ठांपर्यंत कोणी तिला बाहेर काढत नाही, हे विशेष.