शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

आंबा झाला स्वस्त!

By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे.

कळमन्यात आवक वाढली : चौकाचौकात विक्रीनागपूर : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त  उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे. सर्वच स्तरातून आंबा खरेदीकडे ओढा वाढत चालला आहे. चौकांमध्ये सर्वत्रच आंब्याची विक्री होत  असल्याचे चित्र आहे. आंब्यांचे दर चांगलेच गडगडल्याने सामान्यांना चांगल्या प्रतिच्या आंब्यांची चवही चाखता येणे शक्य झाले आहे. बैंगनफल्ली किरकोळमध्ये आंबा  ३0 रुपये किलो आहे. पण उत्पादक शेतकरी मात्र आंब्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळू लागल्याने अडचणीत आले आहेत. यंदा हापूस  आंब्याच्या परदेशी वारीवर प्रतिबंध लागल्याने काही दिवसांआधी कळमन्यात चार डझन हापूसची पेटी १000 ते १२00 रुपयात होती. आता ४00  रुपये डझन असा दर आहे. सर्वसाधारणपणे नागपुरात सर्वाधिक विकणारा बैंगनफल्ली आंबा दरवर्षी किरकोळमध्ये ५0 रुपये किलोखाली मिळत नाही.  पण यंदा किमती २0 रुपयांपर्यंंंंत खाली आल्या होत्या.कळमना फ्रूट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मध्यंतरी भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून मागणी नव्हती. त्यामुळे दर  प्रति किलो २0 रुपयांपर्यंंंंत खाली आले होते. लहानांपासून मोठय़ापर्यंंंंत सर्वांंंंनाच आंब्याची चव चाखण्याची इच्छा असते. हल्ली संकरित जातीमुळे  वर्षभर आंबे बाजारात दिसत असले तरी या मोसमात आंबे खाण्याची लज्जत काही औरच असते. सुरुवातीला आवक कमी असते. मागणीही फारशी  नसते. नंतर मात्र आवकही वाढते आणि मागणीदेखील वाढतच जाते. त्यामुळे आंब्याची बाजारपेठ चांगलीच फुलते. बाजारपेठेत इतर आंब्यासहित  हापूस आंबादेखील आहे. खवय्यांना यावर्षी स्वस्तात आंब्याची गोडी चाखण्याची पर्वणीच मिळाली आहे. (प्रतिनिधी)दररोज सुरू आहे                   १२५ ट्रकची आवकआनंद डोंगरे यांनी सांगितले की, सध्या कळमना बाजारात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून दररोज १२५ ट्रकची (५ ते १0 टन) आवक आहे.  होलसेलमध्ये आंबा दर्जानुसार १५ ते २५ रुपये किलो आहे. हापूस ४00 ते ५00 रुपये डझन आहे. गुजरातच्या नवसारी येथून दररोज केसर आंब्याचे  चार ते पाच ट्रक येत आहेत. १0 किलोला २५0 ते ३५0 रुपये दर आहे. स्थानिक केसर आंब्याचे दर १0 ते १५ रुपये किलो आहे. यावर्षी लंगडा दशेरी  आंब्याची आवक अर्धीच आहे. स्थानिकांचा माल येत आहे. गुणवत्ता पाहून दर आहे. कळमन्यातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि नेपाळच्या सीमेपर्यंंंंत  माल जातो. यंदा पाऊस लांबल्याने १५ जूनपर्यंंंंत आंब्याची भरपूर आवक राहील.