मंगलमूर्ती मोरया...दहा दिवसांपासून आनंद-उत्साहाला उधाण आले होते. आज मात्र मन भरून आले. मनोकामना पूर्ण करणाऱ्या, सारे घर हसत-खेळत ठेवणाऱ्या लाडक्या बाप्पाने नेमाप्रमाणे निरोप घेतला. अर्थात या निरोपाच्या क्षणात पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन होते. त्यामुळे भक्तांच्या उत्साही चेहऱ्यावर हास्य असले तरी डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. फुटाळा परिसर विसर्जनासाठी दिवसभरच भक्तांच्या गर्दीने फुललेला होता.
मंगलमूर्ती मोरया...
By admin | Updated: September 17, 2016 03:03 IST