शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नागपुरातील मानकापूर स्टेडियम चौक बनला ‘ब्लॅक स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 10:35 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९ वरील मानकापूर स्टेडियम चौक वाढत्या अपघातामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. उड्डाणपूल बनल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देजुना रस्ता बंद होणारन्यू मानकापूर-जयहिंदनगरदरम्यान बनणार दुभाजक

सैयद मोबीन।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९ वरील मानकापूर स्टेडियम चौक वाढत्या अपघातामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. उड्डाणपूल बनल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. चौकात सिग्नल असल्यानंतर साईड लेनमधून येणाऱ्या वाहनांना सिग्नलचा फायदा मिळत नसल्याने वाहनचालक सिग्नल तोडतात आणि त्यामुळे अपघात होतात. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी जयहिंदनगर आणि न्यू मानकापूरच्या मध्य भागातून जाणारा रस्ता दुभाजकाच्या माध्यमातून बंद होणार आहे. मानकापूर स्टेडियम चौक (कल्पना टॉकीज चौक) ते फरस फाट्यापर्यंत उड्डाणपूल बनल्यानंतरच साईड लेनमधून येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता पार करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.मानकापूरकडून साईल लेनकडून येणाºया वाहनांना जर जयहिंदनगरकडे जायचे असेल तर यू-टर्न घेणे अत्यंत कठीण काम आहे. कारण उड्डाणपुलावर उभे वाहन हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर जयहिंदनगरकडे जाऊन यू-टर्न घेतात. यादरम्यान साईड लेनमधील वाहनचालक सिंग्नल तोडत असल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. ही समस्या मानकापूर स्टेडियमकडून यू-टर्न घेणाऱ्या वाहनचालकांची आहे. पागलखाना चौकाकडून येणारे वाहन हिरवा सिंग्नल मिळताच मानकापूर उड्डाणपुलावर जाऊन यू-टर्न घेतात. पण स्टेडियमकडून येणाऱ्या वाहनचालकांना या चौकातून यू-टर्न घेणे अत्यंत जोखिमेचे काम आहे. दोन्ही बाजूने वाहने वेगात येतात. त्यानंतर वाहनचालक जोखिम घेऊन यू-टर्न घेतात. यामुळेच या चौकात दरदिवशी अपघात होतात.अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पागलखाना चौकातून रिझर्व्ह बँकेपर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपुलासोबतच मानकापूर स्टेडियम चौकात दुभाजक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जयहिंदनगर आणि न्यू मानकापूरदरम्यानचा थेट रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे जयहिंदनगर येथून न्यू मानकापूरला जाणाऱ्या वाहनांना मानकापूर चौकाकडे जाऊन भूमिगत मार्गाने यू-टर्न घेऊन परत यावे लागेल. याचप्रकारे न्यू मानकापूरकडून जयहिंदनगरकडे जाणाºया वाहनांना पागलखाना चौकाकडे जाऊन प्रस्तावित भूमिगत मार्गातून यू-टर्न घेऊन परत यावे लागेल.

... तर फरस फाट्यासारखे हाल होणारजशी व्यवस्था मानकापूर स्टेडियम चौकात प्रस्तावित आहे, तशीच व्यवस्था फरस-मानकापूर घाटाजवळ करण्यात आली आहे. मानकापूर स्टेडियम चौकात दुभाजक बनल्यानंतर महामार्गावरून येणाऱ्या गाड्या वेगात जातील. अशावेळी न्यू मानकापूर ते पागलखानाकडे आणि जयहिंदनगर येथून मानकापूर चौकाकडे वळणाऱ्या वाहनांची महामार्गावरून वेगात जाणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता राहणार आहे. तर दुभाजक ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जबाबदारीने रस्ता पार करावा लागेल.

मानकापूर स्टेडियम चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी योजना तयार आहे. पागलखाना चौक ते रिझर्व्ह बँकेपर्यंत उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. मानकापूर स्टेडियम चौकात दुभाजक तयार करण्यात येत असल्यामुळे जयहिंदनगर आणि न्यू मानकापूर यादरम्यानचा थेट रस्ता बंद होईल. त्यामुळे दोन्ही भागातील वाहनांना चौकातून जाण्यासाठी भूमिगत मार्गाचा उपयोग करावा लागेल. यामुळे अपघात होणार नाहीत.- एम. चंद्रशेखर,महाव्यवस्थापक, एनएचएआय.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा