शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

माणुसकी जपणारा माणूस ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नवी आशा, नवी दिशा .... या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यमय ओळी जीवन जगण्याची ...

नवी आशा, नवी दिशा ....

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यमय ओळी जीवन जगण्याची व सार्थक बनविण्याची प्रेरणा देतात. काही लोकांचे अर्थपूर्ण व कर्मयोगी जीवनसुद्धा आपल्याला असेच प्रेरित करतात. काही लोकांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. त्यांना जाणून घेण्याचे कुतूहल नेहमीच राहते. या कुतूहलाचे निवारण हे वेगवेगळ्या टप्प्यांवर घडून येत असते. असेच कुतूहलपूर्ण व्यक्तिमत्त्व दीपक चाफले.

काही लोक एकटे तर काही इतरांना सोबत घेऊन मोठे होतात. त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांनी कमविलेली माणसं. त्यांचे विशेष गुणधर्म म्हणजे त्यांनी कायमस्वरूपी जपलेली माणुसकी.

अनुभवाच्या काळ्या मातीत जन्मलेले आणि बहरलेले हे व्यक्तिमत्त्व. काळाची पावले ओळखून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी भिनलेली आहे. शिक्षणाला कौशल्याची जोड मिळाल्याशिवाय शिक्षण बहरत नाही, हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण. पण नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाला विशेष स्थान मिळाले आहे. चाफले यांनी आपल्या शिक्षण संस्थेत नवीन शैक्षणिक धोरण येण्याआधीच कौशल्याधारित शिक्षणासाठी कंबर कसली. ‘इंडस्ट्री विहीन इन्स्टिट्यूट’ आणि कौशल्य व उद्यमिता विकास केंद्राने (सीएसईडी) महाविद्यालयात (सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी) कौशल्य आधारित शिक्षण आधीच सुरू केले. केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. केंद्राच्या माध्यमातून विविध विषयांवर स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, होम ऑटोमेशन, शिट-मेटल डिझाईन, इंडस्ट्री ४-० व डेटा सायन्स इत्यादी विषयांवर इंटरशीप व कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.

प्रत्येकाला समाजाचे देणे लागते हे चाफले यांना अवगत आहे. इतर लोक आपले वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे करतात तेव्हा चाफले आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवितात. यावर्षीसुद्धा हेडगेवार रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि डोंगरवार डेंटल केअर क्लिनिकच्या माध्यमातून मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटीचे मोफत शिकवणी वर्ग व मॉक टेस्ट सिरीजचे आयोजन केले आहे. ‘फ्यूचर स्किल्स’ या उपक्रमांतर्गत कॅड ऑफ बुलडोजर व आयओटीवर वर्कशॉपचे आयोजन आणि लो कॉस्ट व्हेंटिलेटर डिझाईन, या विषयांवर इंटरशिप घेण्यात येणार आहे.

संशोधन हा शिक्षणाचा कणा आहे. चाफले नेहमीच महाविद्यालयीन प्राध्यापकांना संशोधन करण्यास प्रेरित करतात. त्यांच्या प्रेरणेने डॉ. विवेक पºहाते, डॉ. संगिता इटनकर, डॉ. अष्टशिल बांभुळकर, डॉ. विजय नागपूरकर, डॉ. मनोज बसेशंकर, डॉ अमोल मुसळे या प्राध्यापकांनी आचार्य पदवी संपादन केली. त्यांची सून रसिका रणजित चाफले हिनेही एलएलबी, एलएलएम व अभियांत्रिकीमध्ये आचार्य पदवी मिळविली. त्यांनी लावलेल्या रोपट्याला वटवृक्षात रूपांतरित करण्यासाठी रणजित चाफले, डॉ. रसिका चाफले, अभिषेक बेलखेडे व ममता बेलखेडे नेहमीच तत्पर असतात.

चाफले यांना अविस्मरणीय प्रवासात अर्धांगिनी पुष्पा चाफले यांनी त्यांची कर्मयोगी क्षमता नेहमीच द्विगुणित केली. भावपूर्ण विचार व शालिनता या गुणांनी नेहमीच अनेकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांचा हा प्रवास आणि प्रभाव निरंतर राहील, यात तसूभरही शंका नाही.