शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

 मेयो रुग्णालयात बुरखा घालून फिरत होता पुरुष; सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले

By सुमेध वाघमार | Updated: June 14, 2023 19:18 IST

या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे.

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान बुरखा व त्यावर अ‍ॅप्रॉन घालून फिरणाºया एका पुरुषाला सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मागील १५ दिवसांपासून तो या वेषात फिरत होता. या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे.

माहितीनुसार, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचा मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा (एमएसएफ) जवानाला बुरखा व त्यावर अ‍ॅप्रान घातलेला महिलेवर संशय आल्याने थांबविले. रुग्णालयाचा आयकार्डची विचारणा केली. ती उत्तर देत नसल्याचे पाहता महिला सुरक्षा रक्षकांना बोलविण्यात आले. तिला बोलते करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे संशय आणखी बळावला. तिचा बुरखा काढला असता आत दाडी-मिशी असलेला तरुण होता. नावाची विचारणा केल्यावर त्याने आपले नाव जावेद सांगितले. असो का करतो, असे विचारल्यावर त्याने स्वत:ला तृतीय पंथी असल्याचे सांगितले. पुरुषांमध्ये आवड असल्याने रुग्णालयात मागील १५दिवसांपासून फिरत असल्याचे तो म्हणाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला तहसील पोलिसांच्या हवाली केले. 

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटल