शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोलणे बंद केल्यामुळे 'त्याने' मित्रावरच ब्लेडने केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 16:02 IST

बोलणे बंद केले म्हणून संतप्त झालेल्या व्यक्तीने आपल्या मित्रावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडली.

नागपूर : बोलणे बंद का केले ? या कारणावरून आपल्या मित्रावरच ब्लेडने वार करून त्यास जखमी केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली. अभय विश्वनाथ सहस्त्रबुद्धे (वय १८, रा. किल्ला रोड महाल असे जखमी मुलाचे नाव असून राजु सुरेशसिंग ठाकुर (४०) असे आरोपीचे नाव आहे.

अभय आणि आरोपी राजु ठाकुर हे ऐकमेकांचे मित्र आहेत. दोघेही मिठा निम दरगाहजवळ राहतात आणि तेथेच झोपतात. मात्र, वर्षभरापूर्वी अभय आपल्या आईकडे महाल भागात रहावयास आला. त्याने ताजबागजवळ एक कामही शोधले. यामुळे, त्यांचे बोलणे कमी झाले, याचा राग राजुने मनात ठेवला.

 शुक्रवारी अभय कामावर जात असताना आरोपी राजुने त्यास एचडी हॉस्पिटलमागे, हनुमान मंदिराजवळ अडविले. तु माझ्याशी का बोलत नाही अशी विचारणा केली. यावेळी अभयने आईने तुझ्याशी बोलण्यास मनाई केल्याचे सांगितले. यावर आरोपीने संतप्त होऊन आपल्या जवळील ब्लेडने अभयच्या गालावर, डाव्या हातावर आणि कंबरेवर वार करून त्यास जखमी केले. अभयने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुखदेव मडावी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी