शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील पोलिस पाटील भरतीमध्ये गैरव्यवहार, कोर्टाने मागितला चौकशी अहवाल

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 8, 2024 19:49 IST

न्यायालयाने सोमवारी याचिकेतील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्य सरकारला एक आठवड्यात भरतीचा मुळ रेकॉर्ड व चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

नागपूर : भंडारा उप-विभागातील पोलिस पाटील भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे शारदा बुधे यांच्यासह दहा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिकेतील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्य सरकारला एक आठवड्यात भरतीचा मुळ रेकॉर्ड व चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. भंडारा उप-विभागामध्ये ४८ पोलिस पाटलांची भरती करण्यासाठी जाहीरात देण्यात आली होती. उमेदवारांची ८० गुणांची लेखी व २० गुणांची मौखिक परीक्षा घेण्यात आली. मौखिक परीक्षेसाठी उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. 

परंतु, समिती सदस्यांनी स्वत: मौखिक परीक्षा घेतली नाही. त्यासाठी वेगळे प्रतिनिधी पाठविले. त्यांनी लेखी परीक्षेत जास्त गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत कमी तर, लेखी परीक्षेत कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत जास्त गुण दिले. निवड झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेत अवैधपणे १८ ते १९ गुण देण्यात आले, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.

मॅटच्या निर्णयालाही आव्हानजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता या भरतीत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सरकारने चौकशी अहवाल स्वीकारून भरती रद्द केली होती. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायाधिकरणने विविध बाबी लक्षात घेता त्या उमेदवारांना सेवेत नियुक्त करण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयातील याचिकेत या निर्णयालाही आव्हान देण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय