शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून द्या : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 21:40 IST

मनमानी व एकतर्फी पद्धतीने वागणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. काही वरिष्ठ अधिकारी निष्काळजीपणे वागत असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मनमानी व एकतर्फी पद्धतीने वागणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. काही वरिष्ठ अधिकारी निष्काळजीपणे वागत असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.एका प्रकरणात अधिकाऱ्याच्या बेजबाबदार कृतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील महिलेला अनुकंपा तत्त्वावरील नोकरी गमवावी लागली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी ही बाब लक्षात घेता राज्य सरकारला फटकारले. अधिकाऱ्यांच्या मनमानी वागण्यामुळे राज्याच्या प्रशासनातील ढिसाळपणा दिसून येतो. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे सरकारने प्रशासनामध्ये आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे, असे न्यायालय म्हणाले.गोंदिया जिल्ह्यातील कटी येथील पुष्पा बिसने यांनी अनुकंपा तत्त्वावरील नोकरी करण्याची स्वत:ची असक्षमता पाहता मुलगा राहुल याला नोकरी मिळण्याकरिता १४ जुलै २०१४ रोजी जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज प्रलंबित असताना राज्य सरकारने २० मे २०१५ रोजी परिपत्रक जारी करून अनुकंपा तत्त्वावरील नोकरी दुसऱ्याला देता येणार नाही, असा नियम लागू केला. असे असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३ फेब्रुवारी २०१७ रोजी पुष्पा यांचा अर्ज मंजूर केला. परंतु, मंत्रालयाने राहुलला नोकरी नाकारल्यामुळे २६ जून २०१८ रोजी संबंधित निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर १४ जानेवारी २०१९ रोजी पुष्पा यांनी वयाची ४५ वर्षे पूर्ण केली. त्यामुळे त्या नोकरीसाठी अपात्र ठरल्या. परिणामी, या मायलेकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नोकरी गमवावी लागली, असे त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, प्रशासकीय मनमानीवर ताशेरे ओढले. तसेच, पुष्पा यांची याचिका मंजूर करून राहुलला नियमानुसार नोकरी देण्याचा आदेश सरकारला दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अरविंद वाघमारे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार