लाेकमत न्यूज नेटवर्क
माेहपा : कळमेश्वर तालुक्यातील माेहपा शहर व परिसरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यावरील खड्ड्यांमुळे छाेट्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यांनी पाेलीस दप्तरी नाेंद देखील नाही. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहतूक करताना शेतमालाचे नुकसान हाेत असल्याने नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते किमान चालण्याच्या लायकीचे करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
रस्ते विकासाच्या बाबतीत माेहपा शहर व परिसर बराच मागे आहे. या भागातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून, दुरुस्तीकडे या विभागाने सुरुवातीपासून दुर्लक्ष केले आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे. या भागातील कोहळी-मोहपा, उबाळी-मोहपा, मोहपा-धापेवाडा आणि मोहपा-तेलगाव हे रस्ते सार्वजनिक विभागाच्या अखत्यारीत आहेत. या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. उबाळी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण तातडीने होणे गरजेचे आहे.
मोहपा हे नगर परिषदेचे शहर आहे. या शहराला कळमेश्वर व सावनेर शहरे तसेच कोहळी व धापेवाडा गावांशी जोडणारे राेडची रुंद साडेसात मीटर रुंद असून, ते समतल नाहीत. जिल्ह्यातील इतर जुन्या नगर परिषद (माेवाड व खापा) शहरांच्या तुलनेत मोहपा शहरातील रस्त्यांची अवस्था फारच दयनीय आहे. हा विकासाचा असमतोल दूर करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया माेहपावासीयांनी व्यक्त केली.
...
मंजुरीनंतरही काम रखडले
मोहगाव ते माेहपा शहरातील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय आणि मांडवी-तेलगाव-तिडंगी या रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजूर देण्यात आली असूनही कामाला अद्याप सुरू करण्यात आली नाही. मोहपा-लोहगड या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे आवश्यक असून, या मार्गावरील बुधला ते लोहगड दरम्यान अगणित खड्डे तयार झाले आहेत. या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागताे. पिपळा (फाटा)-धापेवाडा रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, त्यावर तयार झालेले मोठमोठे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असून, मागील वर्षी काही भागाचे झालेले रुंदीकरण करण्यात आले. परंतु, त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.
...
कमी अंतर व साेयीचा मार्ग
उबाळी-मोहपा राेड उखडला असून, नागपूर येथून नरखेड, मोवाड, सावरगाव व पांढुर्णा (मध्य प्रदेश)कडे जाण्यासाठी मोहपा-लोहगड हा मार्ग सर्वात कमी अंतराचा, साेयीचा आणि प्रवासातील वेळेची बचत करणारा आहे. ही शहरे बाजारपेठांची महत्त्वाची ठिकाणी असल्याने या मार्गाचा प्राधान्याने विकास करणे गरज आहे. धापेवाडा आणि लोहगड रस्त्यांचा दर्जा वाढविणे आवश्यक आहे. सर्वांगीण विकासात रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या भागातील रस्त्यांची दर्जेदार दुुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.