शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा : नितीन गडकरींचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:35 IST

योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसाराचे कार्य केले. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करण्याची गरज आहे. योगाचा प्रसार शेवटच्या माणसापर्र्यंत जावा आणि प्रत्येकाचे जीवन कुठलेही औषध न घेता निरोगी रहावे, यासाठी नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

ठळक मुद्देयशवंत स्टेडियमवर झाला सामूहिक योगाभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसाराचे कार्य केले. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करण्याची गरज आहे. योगाचा प्रसार शेवटच्या माणसापर्र्यंत जावा आणि प्रत्येकाचे जीवन कुठलेही औषध न घेता निरोगी रहावे, यासाठी नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. 

नागपूर महापालिका आणि नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे जागतिक योग दिनाचे आयोजन यशवंत स्टेडियम येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सर्वेसर्वा रामभाऊ खांडवे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्त अजिभित बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, राम जोशी, प्रमोद तभाने, नेहरू युवा केंद्राचे शरद साळुंके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध योगाभ्यासी मंडळाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रसंगी सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. 
योगातील विविध आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार सादर करण्यात आले. सामूहिक ओंकाराचा गजर व शांतीमंत्र म्हणण्यात आले. तर सहज योगाचे प्रात्यक्षिक सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी मानले. गडकरींनीही केला योगाभ्यास 
नागपूर महापालिकेने आयोजित केलेल्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात पहाटेच गडकरी उपस्थित झाले. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या सदस्यांनी मंचावर उपस्थित आणि सामूहिक योगात सहभागी झालेल्यांकडून योगाचे प्रात्यक्षिक करवून घेतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा या सामूहिक योगाभ्यासात सहभागी झाले होते. गडकरींनी भ्रमरी प्राणायाम, अनुलोम विलोम, पद्मासन व विविध योगाची आसने केली. यावेळी त्यांनी ओंकाराचा गजर केला आणि सामूहिक शांतीमंत्र सुद्धा म्हंटला.

टॅग्स :YogaयोगNitin Gadkariनितीन गडकरीYashvant Stadiumयशवंत स्टेडियम