शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुधाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करणार; दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:35 IST

राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शुगर प्राईज कंट्रोल अ‍ॅक्टच्या धर्तीवर दुधाकरिता कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देखाजगी दूध खरेदी विक्रीवर शासनाचे नियंत्रण नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शुगर प्राईज कंट्रोल अ‍ॅक्टच्या धर्तीवर दुधाकरिता कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्यां शेतकऱ्यांना दूध उत्पादक संस्थांकडून दुधाला वेगवेगळे दर दिले जातात. शासनाने निश्चित केलेले दूध खरेदी दर हे शासन व सहकार क्षेत्राकरिता लागू आहेत. मात्र खासगी क्षेत्राच्या दूध खरेदी व विक्री दरावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी दूध क्षेत्राकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे दर दिले जातात, अशी माहिती जानकर यांनी दिली.दुधाला हमीभाव मिळावा, अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये अंतर्भूत आहे. या अधिनियमातील कलम ३(२)(क) येथील तरतुदीनुसार जीवनावश्यक पदार्थांसाठी किमान आधारभूत खरेदी दर निश्चित करण्याचे अधिकार केंद्र शासनाला असल्याची माहिती जानकर यांनी लेखी उत्तरात दिली.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती