शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

राज्यात आयुर्वेद विद्यापीठ व्हावे

By admin | Updated: October 10, 2015 03:15 IST

महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ झाले पाहिजे, या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल.

देवेंद्र फडणवीस : श्री आयुर्वेद महाविद्यालयातर्फे रसाचार्यांचा सत्कारनागपूर : महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ झाले पाहिजे, या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. या विद्यापीठाचे मॉडेल कसे असावे, ते पूर्णत: सरकारी विद्यापीठ असावे की, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्थांनी व व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन करावे किंवा विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापन व्हावे याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाअंतर्गत सुवर्ण जयंती स्मरणिका ‘बखरश्रीची ’चे प्रकाशन तसेच १७ रसाचार्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा हे होते.मुख्यमंत्री म्हणाले, आयुर्वेद हे अतिप्राचीन उपचाराचे शास्त्र आहे, जेव्हा ‘मॉडर्न मेडिसीन’ नव्हती त्यावेळी आयुर्वेदाद्वारेच उपचार व्हायचे. परंतु सध्याच्या ‘मॉडर्न मेडिसीन’च्या जगात आयुर्वेदाला पूर्वीचे स्थान राहिले नाही. संपूर्ण जग आयुर्वेदाकडे वळत असताना, देशातील आयुर्वेद पॅथीवरील आपला विश्वास कमी झाला आहे. आयुर्वेद शास्त्रात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. एखाद्या रोगाच्या मुळाशी जाऊन तो रोग पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद आयुर्वेदात आहे. जिथे अ‍ॅलोपॅथी उपचार अपुरे पडतात त्यानंतर आयुर्वेदाकडे वळलेले अनेक रुग्ण दीर्घ उपचारानंतर बरे झालेले आहेत. त्यामुळे आपल्या देशाने आयुर्वेदाचे महत्त्व ओळखून ते सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.प्रास्ताविक भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी केले. त्यांनी श्री आयुर्वेद महाविद्यालयासंदर्भातील अडचणी मांडत, नागपुरात स्वतंत्र आयुष विद्यालय निर्माण करण्याची मागणी केली. कार्यक्रमात ‘बखरश्रीची’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वैद्य संदीप शिरवळकर यांनी केले. कार्यक्रमाला वैद्य वेदप्रकाश शर्मा, वैद्य सीताराम शर्मा, वैद्य मृत्युंजय शर्मा, डॉ. उपेंद्र कोटेकर, प्राचार्या वैद्य मनीषा कोटेकर, रमण बेलगे, ब्रजेश मिश्रा, वैद्य रचना रामटेके उपस्थित होते. (प्रतिनिधी)