शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

वादळग्रस्तांना सर्व सुविधा उपलब्ध करा

By admin | Updated: May 24, 2016 02:40 IST

येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा.

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : दुष्काळी भागाचा पाहणी दौरानागपूर : येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत युद्धस्तरावर पुरवा. उन्हाळा असल्यामुळे या भागातील पाणीटंचाईचे निवारण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून करावे. पाच दिवसांत गावांचे नियमितपणे व्यवहार सुरू व्हावेत अशा व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.काटोल-नरखेड तालुक्यात गेल्या १९ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून वादळग्रस्तांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी सोमवारी या भागाचा दौरा केला. यावेळी या भागाचे आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प.चे शिक्षण सभापती उमेश चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, काटोलचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.गेल्या १९ मे रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने जामगाव व खापा या दोन गावांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जामगावातील १५२ घरांचे नुकसान झाले. तर १०८ हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान वादळाने झाल्याचे आढळले. वादळाच्या तडाख्यात एकूण १० गावे सापडली होती. ही दहा गावे नरखेड तालुक्यातील होती. पाच मिनिटे झालेल्या या वादळात ३८५ घरांचे नुकसान होऊन ३३५ हेक्टर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे.चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गावांमधील वीजपुरवठा दोन दिवस खंडित होता. पण सोमवारी फक्त जामगाव वगळता संपूर्ण गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. जामगाव येथील वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत होईल. वादळग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व महावितरणच्या चमू युद्धस्तरावर काम करीत असून वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर आहेत. वादळामुळे ३३ केव्हीचे १६ पोल खाली पडले. लोखंडी खांबे वाकून ते इंग्रजीच्या यू आकाराचे झाले. सिमेंटचे विजेचे खांब मधून तुटले. एवढेच नव्हे तर जामगाव येथील ट्रॉन्सफॉर्मर डीपी खाली पडली. मोठमोठी शेकडो झाडे विजेच्या तारांवर पडल्यामुळे खांब वाकले. ११ केव्हीचे २८ खांब वाकले. घरगुती वीजपुरवठा करणारे गावठाणातील २० खांब वाकले व शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे १५० खांब वाकले आहेत. दोन ट्रॉन्सफॉर्मर वादळामुळे बिघडले. वादळगस्त भागाचे वीज साहित्याचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून नुकसानग्रस्त भागातील वीज पुरवठ्याच्या साहित्याचा निधी लवकर उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.जामगाव व परिसरात खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. परिणामी जिल्हा प्रशासनाने तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा सुरू केला असून नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू व तांदूळ देण्यात येत आहेत. तसेच रॉकेलचा पुरवठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.वादळानंतर सुमारे आठवडाभरात जनजीवन सामान्य होत आहे. शासनाच्या संबंधित विभागाच्या चमू या भागात दाखल झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज व सर्वेक्षण सुरू असून अनेकांची घरावरील छपरे उडून गेली. जनावरांचे गोठेही जमीनदोस्त झाले. वादळामुळे एक गाय व एक बैल दगावला. या दोन्ही जनावरांची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्याला देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)