शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

...तर यावेळेस पतंगाच्या मांजाने गळा कापण्याची भीती नाही; तारेवर पडताच क्षणात तुटणार मांजा

By मंगेश व्यवहारे | Updated: January 5, 2025 13:54 IST

निखिल उंबरकर यांनी मांजामुळे होणारे अपघात, गळे कापाकापी टाळता येईल, यासाठी एक उत्तम मॉडेल तयार केले आहे.

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मकरसंक्रांती जवळ येताच दुचाकी चालविणारे जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नायलॉन मांजा कधी कुणाच्या गळ्याचा फास घेईल हे सांगताच येत नाही.  पतंग उत्सवात नायलॉन मांजा वापर टाळावा म्हणून पोलिस व महापालिका  प्रशासनाकडून दरवर्षी कारवाया केल्या जातात. मात्र, त्यावर पूर्णपणे अंकुश मिळविणे प्रशासनालाही शक्य झाले नाही. निखिल उंबरकर यांनी मांजामुळे होणारे अपघात, गळे कापाकापी टाळता येईल, यासाठी एक उत्तम मॉडेल तयार केले आहे. त्याने तयार केलेल्या मॉडेलमध्ये लावलेल्या तारेवर मांजा पडताच अगदी क्षणात तुटत असल्याने मांजामुळे होणारी प्राणहानी टाळण्यास मदत होणार आहे. 

निखिल हे ऑटोमोबाइल इंजिनीअर असून, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी त्यांनी  यापूर्वी हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरूच होणार नाही, असे हेल्मेट तयार केले होते. रुफ टॉप ब्रेक विकसित केले होते. 

मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही निखिलने एक मॉडेल तयार केले आहे. त्या मॉडेलमध्ये एक रस्ता असून, रस्त्याच्या दुतर्फा विद्युत खांब आहेत. या खांबांच्या आधारे एक तार लावली आहे. या तारेमध्ये डीसी करंट सोडला आहे. या तारेवर मांजा ठेवताच तो लगेच तुटून जातो. 

हा माझा डेमो प्रोजेक्ट आहे. स्थानिक प्रशासनाने सहकार्य केल्यास मी ते प्रत्यक्षात शहरामध्ये काही भागात राबवू शकतो. या प्रोजेक्टचे महत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पटवून देणार आहे. मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी माझी कल्पना उपयोगात आणल्यास मांजामुळे होणाऱ्या अपघातातून बऱ्यापैकी मुक्ती मिळू शकेल.- निखिल उंबरकर, ऑटोमोबाइल इंजिनीअर

टॅग्स :kiteपतंगnagpurनागपूर