शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील टेकडी गणेश उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:14 IST

गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठी मांडण्यात आलेला प्रस्ताव रोखण्याची मागणी केली. सत्तापक्षाने याला नकार दिला. यावर काँग्रेसने मतदानाची मागणी केली. त्यानुसार मतदान घेण्यात आले. यात उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने ९२ तर पूल तोडण्याच्या विरोधात २३ मते पडली. विशेष म्हणजे बसपाचे नगरसेवक संजय बुर्रेवार यांनी सत्तापक्षाच्या बाजूने मतदान केले.

ठळक मुद्देप्रस्तावाच्या बाजूने ९२ तर विरोधात २३ मते; बसपाच्या एका नगरसेवकाचा पाठिंबाविरोधकांचा नोंदविला विरोध : तांत्रिक अहवालापूर्वीच प्रस्ताव आणल्याचा आरोप

लोकमत न्यूज नटेवर्कनागपूर : गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठी मांडण्यात आलेला प्रस्ताव रोखण्याची मागणी केली. सत्तापक्षाने याला नकार दिला. यावर काँग्रेसने मतदानाची मागणी केली. त्यानुसार मतदान घेण्यात आले. यात उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने ९२ तर पूल तोडण्याच्या विरोधात २३ मते पडली. विशेष म्हणजे बसपाचे नगरसेवक संजय बुर्रेवार यांनी सत्तापक्षाच्या बाजूने मतदान केले.सभागृहात बसपाच्या नगरसेवकांचा उड्डाणपूल तोडण्याला विरोध होता. मात्र बसपाचे प्रभाग ९ मधील नगरसेवक संजय बुर्रेवार यांनी उड्डाणपूल तोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. उड्डाणपुलामुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच रहदारीला अडथळा होत असल्याने सत्तापक्षाच्या बाजूने मतदान केल्याची भूमिका त्यांनी मांडली.व्हीएनआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सभागृहात याबाबतचा विस्तृत अहवाल मांडण्यात आलेला नाही. तांत्रिक अहवाल आलेला नाही. दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नसल्याने प्रस्तावाला विरोध असल्याची भूमिका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मांडली. काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनीही सत्तापक्षावर टीका केली.रामझुल्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जयस्तंभ चौकातील वाहतुकीसंदर्भात व्हीएनआयटी आपला अहवाल देणार आहे. असे असतानाही उड्डाणपूल तोडण्याची घाई कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षाने केला. काँग्रेसचे मनोज सांगोळे म्हणाले, चेंबर, गडर लाईन दुरुस्तीसाठी पैसे नाही. कर्ज घेऊ न शहराचा विकास केला जात आहे. विकासात बाधा असलेले रस्त्यांवरील खड्डे आधी बुजवा, ज्या अधिकाºयांकडे अतिरिक्त प्रभार आहे, त्यांचा भार कमी करा.भाजपाचे नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले, मेट्रो शहरातील वाहतूक व्यवस्थेवर काम करीत आहे. त्यामुळे उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रशासनाला त्यांचा अहवाल मान्य असल्याने यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही.प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे प्रशासनाची बाजू मांडताना म्हणाले, उड्डाण पुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येईल. १७४ पैकी १६४ दुकानदारांना परवाना दिलेला आहे. तांत्रिक अहवाल महामेट्रोने दिला आहे. तो सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल. महामेट्रो जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान सहापदरी मार्गाचे निर्माण करणार असल्याने उड्डाण पूल तोडण्याचे व दुकानदारांच्या पुनर्वसनाचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे. शहर काम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी आराखड्याच्या आधारावर उड्डाण पूल तोडणे आवश्यक आहे.विकासाच्या नावावर बेरोजगार करण्याचा प्रयत्नविकासाला काँग्रेसचा विरोध नाही. परंतु विकासाच्या नावाखाली लोकांना बेरोजगार करू नये. १६ कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनसमोरील उड्डाण पुलाखाली १७५ दुकाने उभारण्यात आली. बहुसंख्य दुकानदारांनी यासाठी कर्ज घेतले आहे. रेल्वे स्टेशनपुढे व्यवसाय होत असल्याने याच ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेतेआधी पुनर्वसन नंतरच उड्डाण पूलमहामेट्रोने उड्डाण पुलाचा तांत्रिक अहवाल दिला आहे. प्रशासनाने तो मान्य केला आहे. तो सभागृहात ठेवलेला नाही. पुढील सभागृहात ठेवला जाईल. आता प्रश्न दुकानदारांच्या पुनर्वसनाचा आहे. आधी पुनर्वसन नंतरच उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात केली जाईल. येथे १६४ दुकाने देण्यात आलेली आहेत. यातील ७२ सुरू आहेत. दुकानदारांना आधी एमएसआरटीच्या जागेवर अस्थायी दुकाने देण्यात येतील. नंतर त्यांना कायमस्वरुपी जागा दिली जाईल.संदीप जोशी, सत्ता पक्षनेते

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर