शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

नागपूरच्या पंचशील चित्रपटगृहात मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 11:39 PM

मुसळधार पावसामुळे पंचशील चित्रपटगृहाच्या छताला गळती लागली. पीओपीच्या छताचे तुकडेही पडले. सुदैवाने छत पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेत चित्रपटगृह व्यवस्थापनाने अर्ध्यावरच शो बंद करून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर काढले. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे चित्रपटगृहात काही वेळेसाठी धावपळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देछताला गळती : पीओपीचे तुकडे : मध्यंतरानंतर शो रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसामुळे पंचशील चित्रपटगृहाच्या छताला गळती लागली. पीओपीच्या छताचे तुकडेही पडले. सुदैवाने छत पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेत चित्रपटगृह व्यवस्थापनाने अर्ध्यावरच शो बंद करून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर काढले. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे चित्रपटगृहात काही वेळेसाठी धावपळ निर्माण झाली होती.सीताबर्डीतील पंचशील सिनेमागृहात ‘काला’ हा हिंदी चित्रपट सध्या सुरु आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते ९ चा शो सुरू झाला. चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. दरम्यान,मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास चित्रपटगृहाच्या बालकनीच्या छतातून अचानक पाणी गळू लागले. पाणी गळतीचे प्रमाण वाढले असतानाच सिलींग फॅनजवळचा पीओपीचा काही भाग तुकडे होऊन खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांवर तसेच आजूबाजूला पडला तर, काही भागांना तडे गेल्याने प्रेक्षकात दहशत निर्माण झाली. परिणामी प्रेक्षकांनी आरडाओरड केली. लगेच चित्रपटगृहात गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने यावेळी अर्धा चित्रपट संपला होता. त्यामुळे सर्वच प्रेक्षक बाहेर पडले. संभाव्य धोका लक्षात घेत व्यवस्थापनाने प्रेक्षकांना शांत करून काहीही धोका नसल्याचे सांगितले. चित्रपटगृहाचे व्यवस्थापक राजा लहरी यांनी चित्रपटाचा पुढचा शो रद्द करण्याची घोषणा करून रसिकांना त्यांच्या तिकिटांचे पैसे परत देण्यात येत असल्याचेही सांगितले. यानंतरचा ९ ते १२ चाही शो रद्द करण्यात आला. तिकडे मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया नोंदवत प्रेक्षक भरपावसातच चित्रपटगृहाबाहेर पडले. त्यांनी चित्रपटगृहाच्या परिसरात थांबण्याऐवजी समोरच्या उड्डाणपुलाखाली थांबणे पसंत केले. दरम्यान, गोंधळाची माहिती कळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.अफवांचा पाऊसदरम्यान, पंचशील चित्रपटगृहाचे छत पडल्याची वार्ता वायुवेगाने उपराजधानीत पसरली. अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर तसे मेसेज व्हायरल झाल्याने अफवांचा सर्वत्र जोरदार पाऊस पडला. दरम्यान, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चित्रपटगृहात पोहचले. मात्र, व्यवस्थापनाने त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई केली. त्यांना बाहेरच थांबवण्यात आले. लोकमत प्रतिनिधीने यासंदर्भात चित्रपटाचे मालक प्रतीक मुणोत यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ही फार मोठी घटना नाही. बालकनीतील सिलींग फॅनजवळच्या ठिकाणाहून पाणी गळती झाली. कुणाला कोणतीही दुखापत झाली नाही. खबरदारी म्हणून चित्रपटाचा पुुढचा शो रद्द करण्यात आला आहे. लगेच छत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :TheatreनाटकAccidentअपघात