शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा :  विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:14 IST

मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांना दिलासा द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यामुळे आता संबंधित कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ग्राहकांचे पैसे परत द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे यांनी विधानसभेत केली.आ. विकास ठाकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नागपूर आणि विदर्भातील ग्राहकांनी सुमारे २५० कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली आहे. एकट्या नागपूर शहरातून सुमारे ५० कोटींची गुंजवणूक झाली आहे. कंपनीने कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारल्या व फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक कंपनी बंद करून पळ काढला. नागरिकांनी हेलपाटे मारूनही त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली नाही. शेकडो नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकारने वर्षभरापूर्वी संबंधित कंपनीची काही मालमत्ता जप्त केली. संबंधित मालमत्तेची विक्री करून ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कराव्या, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

सिमेंट रोडच्या कामांची चौकशी करा

नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून कामही संथगतीने सुरू आहे. संबंधित रस्त्यांची कामे किती कालावधीत पूर्ण करायची होती, कंत्राटदाराने कामे मुदतीत पूर्ण केली का, कामात गुणवत्ता राखली जात आहे का, या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना आ. ठाकरे यांनी नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, पश्चिम नागपूर मतदारसंघात तेलंखेडी, झिंगाबाई टाकळी, फुटाळा, टाकळी फिडर रोड, घाट रोड, सेमिनरी हिल रोड येथे सिमेंट रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. कामे अर्धवट झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावरील धूळ उडत असून  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. काही कामांची मुदत संपूनही ती पूर्ण झालेली नाहीत. अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करीत नाही. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच  संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेInvestmentगुंतवणूकvidhan sabhaविधानसभा