शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नागपुरात मेट्रो रेल्वे करणार ‘झिरो माईल’ची देखभाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:26 PM

झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वॉक’ सुविधेचा प्रस्ताव शुक्रवारी हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली. तसेच झिरो माईलचा स्तंभ व परिसराची देखभाल दुरुस्तीचे कामही मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला करावे लागेल, असे सूचितही केले. यासोबतच कस्तूरचंद पार्क सौंदर्यीकरणाच्या संशोधित प्रारुपलाही या बैठकीत समितीने मंजुरी प्रदान केली.

ठळक मुद्देहेरिटेज समितीच्या बैठकीत निर्णय : कस्तूरचंद पार्क सौंदर्यीकरणाच्या संशोधित प्रारुपलाही मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वॉक’ सुविधेचा प्रस्ताव शुक्रवारी हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली. तसेच झिरो माईलचा स्तंभ व परिसराची देखभाल दुरुस्तीचे कामही मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला करावे लागेल, असे सूचितही केले. यासोबतच कस्तूरचंद पार्क सौंदर्यीकरणाच्या संशोधित प्रारुपलाही या बैठकीत समितीने मंजुरी प्रदान केली. पुढील कार्यवाहीसाठी नगररचना विभागासमोर नकाशा सादर करण्यात आला.मनपा मुख्यालयातील नगररचना विभागात शुक्रवारी नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा हेरिटेज संवर्धन समितीची बैठक पार पडली. बैठकीत समितीचे सदस्य व प्रसिद्ध आर्किटेक्ट अशोक मोखा, इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शोभा जोहरी, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस. पाटणकर, एलएडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव, नगररचना विभाग नागपूर विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, मनपाचे नगररचनाकार सोनारे, नागपूर मेट्रो रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राजीव येलवटकर आदी उपस्थित होते.कस्तूरचंद पार्कमध्ये लोकांच्या सुविधांच्या दृष्टीने जॉगिंग, वॉकिंग, सायकल ट्रॅक, वृक्षारोपण, हिरवळ आदी कामांचा प्रस्ताव मनपाच्या प्रकल्प विभागातर्फे सादर करण्यात आला होता. गेल्या बैठकीत समितीला दोन वेगवेगळे प्रस्ताव प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत समितीने कस्तूरचंद पार्कचा संशोधित प्रस्ताव तयार करून बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा संशोधित प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला समितीने मंजुरी प्रदान केली.सेमिनरी हिल्स परिसरातील सेंटर पॉर्इंट स्कू लतर्फे हेरिटेज समितीच्या मंजुरीशिवाय बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील वृक्ष व पर्यावरणाला नुकसान पोहोचले असल्याची तक्रार विवेक सिंह यांनी समितीकडे केली होती. यावर समितीने संंबंधित प्रकरणाच्या चौकशीसाटी डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठित करण्याचे आदेश दिले. यात अशोक मोखा व पी.एस. पाटणकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. ही समिती चौकशी करून योग्य अहवाल सादर करेल.कस्तूरचंद पार्कमध्ये अमर सर्कस संचालित करण्यासाठी नीरज घाडगे यांनी प्रस्ताव सादर केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत हेरिटेज संवर्धन समितीने हा प्रस्ताव नामंजूर केला.

टॅग्स :Metroमेट्रोZero Mileझीरो माईल