शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

पदवीधरचा गड कायम राखा

By admin | Updated: June 16, 2014 01:09 IST

आजपर्यंत मला प्राध्यापकांनी नेहमीच समर्थन दिले. तुमच्या विश्वासामुळेच मी आज या पदावर पोहोचू शकलो आहे. आता तुमच्यातीलच एक असलेले पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना,

गडकरी यांचे आवाहन : प्राध्यापकांशी संवाद नागपूर : आजपर्यंत मला प्राध्यापकांनी नेहमीच समर्थन दिले. तुमच्या विश्वासामुळेच मी आज या पदावर पोहोचू शकलो आहे. आता तुमच्यातीलच एक असलेले पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांच्या पाठीमागे असेच भक्कमपणे उभे रहा व गड कायम राखा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. प्राध्यापक मित्र मंडळाद्वारे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित ‘संवाद’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.विद्यापीठाला गतिशील करण्यासाठी अनिल सोले यांच्यासारखे प्राध्यापक मोलाची भूमिका पार पाडू शकतात. शिक्षण देण्यासोबतच प्राध्यापकांनी आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला पाहिजे. शिक्षणाचे धडे देताना तंत्रज्ञानाची कास पकडून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता जागवली पाहिजे . शिकविण्याला जर ‘व्हिजन’ ची जोडी दिली तर त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी शिक्षक आमदार नागो गाणार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर, प्रभूजी देशपांडे, प्राचार्य बोंद्रे, डॉ.चंद्रशेखर भुसारी, अशोक जीवतोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.देशात धावणार ‘ई-रिक्शा’देशात लवकरच ‘ई-रिक्शा’ सुरू होणार असल्याची माहितीदेखील नितीन गडकरी यांनी दिली. १७ तारखेला यासंदर्भात विस्तृत निर्णय जाहीर करणार असून यामुळे देशातील २ कोटी लोकांना नवीन जीवन मिळेल. शिवाय माणसाला माणसाने ओढण्याची अमानवीय पद्धत बंद होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)