शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बचत गटांच्या महिलांनी परत केले ४२ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:50 IST

बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळत आहे. अशा कर्जबुडव्यांना आणि बँकांना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लावली आहे. या महिलांनी विविध बँकांकडून घेतलेले ४२ कोटी रुपयांचे कर्ज एकही हप्ता न चुकविता परत केले आहे. अशिक्षित, गरीब महिलांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा खरोखरच देशहिताचा आहे.

ठळक मुद्देकर्जबुडवे व बॅँकांनाही चपराक : ग्रामीण महिलांच्या प्रगतीच्या पाऊलवाटा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळत आहे. अशा कर्जबुडव्यांना आणि बँकांना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लावली आहे. या महिलांनी विविध बँकांकडून घेतलेले ४२ कोटी रुपयांचे कर्ज एकही हप्ता न चुकविता परत केले आहे. अशिक्षित, गरीब महिलांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा खरोखरच देशहिताचा आहे.ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या पाऊलवाटा दाखविल्या आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वत:चा, कुटुंबाचा आणि गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा प्रोत्साहन देत आहे. महिलांची प्रगती साधण्यासाठी या यंत्रणेने महिलांना कर्जाचा पुरवठा केला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २६६९ महिला बचत गटांना ४२.६३ कोटी रुपयांचे कर्ज यंत्रणेने उपलब्ध करून दिले होते. त्याची १०० टक्के परतफेड या महिलांनी केली आहे.महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण विकास यंत्रणेला टार्गेट देण्यात येतो. यात बचत गटांची निर्मिती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणे या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य व स्वावलंबी बनविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने यावर्षी १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. बचत गटांची व्यावसायिक वाटचालयंत्रणेच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील काही महिला बचत गटांनी सॅनिटरी नॅफकीन, सेंद्रीय खताची निर्मिती, ज्वेलरी, शर्ट, बॅग, मेणबत्ती, अगरबत्ती व छोटेमोठे गृह उद्योग लावले आहे.

टॅग्स :Womenमहिलाbankबँक