शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण म्हणते प्लीज ११ ला जॉईन व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:23 IST

वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.

ठळक मुद्दे२०१४ ची भरती प्रक्रिया ४६९ उमेदवारांचा नोकरी देण्यासाठी शोध सुरू

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मथळा वाचून आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.आता स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो कीअखेर असे काय झाले. सरकारी नोकरीसाठी लोक काय काय करीत नाही. परंतु येथे स्वत: प्रशासन उमेदवारांना जॉईन करून घेण्यासाठी धावपळ करीत आहे. या उमेदवारांमध्ये असे काय विशेष दडले आहे. चला खरा प्रकार काय ते जाणून घेऊ या.हे सर्व उमेदवार २०१४ मध्ये महावितरणच्या भरती प्रक्रियेत यशस्वी होऊन विद्युत सहायक बनण्यासाठी पात्र ठरले होते. सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास (ईएसबीसी)च्या नावावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुरुवात याच भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू झाली होती.परंतु ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच न्यायालयीन अडचणीत फसली आहे. अगोदर याचिका दाखल करून भरतीसाठी दहावी व आयटीआयमधील गुणांना आधार बनवण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयावर याला आधार बनवून पुन्हा अर्ज मागवण्यात आले. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राजकारण तापले. मोर्चे निघायला सुरुवात झाली.निवड झालेल्या ४६९ उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात आली. परंतु ते जॉईन करण्यापूर्वीच प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. अखेर सरकारने ईएसबीसीला एसईबीसी (विशेष दर्जा) दिला. सर्वोच्च न्यायालयानेही हिरवी झेंडी दाखवली. जुलैमध्ये आरक्षणाबाबत जी.आर. सुद्धा जरी झाला. यासोबतच २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना जॉईन करण्यास सुरुवात करण्यात आली. या उमेदवारांना ३ नोव्हेंबरपर्यंत आपले दस्तावेज महावितरणच्या वेबसाईटवर अपलोड करावयाचे आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांना नियुक्तीच्या जागेवर पोहोचून जॉईन सुद्धा व्हायचे आहे. परंतु समस्या इथेच निर्माण झाली आहे. बहुतांश उमेदवारांशी संपर्क होत नाही आहे. महावितरणच्या वेबसाईटवर आतापर्यंत नाममात्र उमेदवारांनीच आपले दस्तावेज अपलोड केले आहेत. कंपनीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.मोबाईल नंबर बंद, मेलसुद्धा होताहेत बाऊन्समहावितरणने या उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी २०१४ मध्ये केलेल्या अर्जासोबत दिलेले मोबाईल क्रमांक आणि ई-मेल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश उमेदवारांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत किंवा ते दुसऱ्याकडे आहेत. त्याचप्रकारे ई-मेल सुद्धा बाऊन्स होत आहेत. तसेही पाच वर्षापर्यंत महावितरणच्या नोकरीची प्रतीक्षा करीत कोणता उमेदवार रिकामा असेल. दहावीनंतर आयटीआय करणाºया त्या उमेदवारांपर्यंत पोहोचणे आता चांगलेच कठीण होऊन बसले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण