शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात नरखेडमध्ये महाविकास आघाडी, काटोलमध्ये राष्ट्रवादीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 18:43 IST

नागपूर जिल्ह्यात नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडी पॅनलने (काँग्रेस-केदार गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी) विजय मिळविला आहे.

ठळक मुद्दे केदारांची देशमुखांवर मात

नागपूर : नरखेड, काटोल आणि कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडी पॅनलने (काँग्रेस-केदार गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी) विजय मिळविला आहे. येथे बाजार समितीच्या निमित्ताने पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या गटाने डॉ. आशिष देशमुख यांच्या गटावर मात केली आहे. (Mahavikas Aghadi in Narkhed in Nagpur district, NCP defeated in Katol)

काटोल बाजार समितीत महाविकास आघाडीच्या (विशेषत: राष्ट्रवादी) शेतकरी विकास पॅनलला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजप समर्थित शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दमदार विजय मिळविला आहे. काटोल न.प.चे गटनेते चरणसिंग ठाकूर व सहकार क्षेत्रातील मात्तबर केशवराव डेहनकर यांच्या नेतृत्वात भाजपने येथे निवडणूक लढविली होती.

कळमेश्वर बाजार समितीवर काँग्रेसने (केदार गट) एकतर्फी विजय मिळविला आहे. येथे यापूर्वीच १५ संचालक अविरोध विजयी झाले होते. रविवारी ग्रामपंचायत मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. दोन्ही जागांवर केदार गटाच्या उमेदवारांनी भाजप समर्थित पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. उपरोक्त तिन्ही बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी संबंधित तालुकास्थळी सुरुवात झाली. नरखेड येथे सुरुवातीच्या कलात भाजप समर्थित बळीराजा सहकारी पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीचा बीपी वाढला होता. मात्र, अंतिम निकालात महाविकास आघाडीच्या पॅनलने बाजी मारली. येथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. आशिष देशमुख गट आणि भाजप समर्थित बळीराजा सहकारी पॅनलने ६ जागा काबीज केल्या आहेत. दोन जागांवर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत.

जि.प. व बाजार समितीच्या निवडणुकीत देशमुख भाजप उमेदवारांचा प्रचार करीत असल्याने त्यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. याची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे नरखेड बाजार समिती आणि नरखेड तालुक्यातील जि.प. सर्कलच्या पोटनिवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सोमवारी बाजार समितीचे निकाल जाहीर झाले. बुधवारी जि.प.चे निकाल जाहीर होतील.

 

नरखेड बाजार समितीनरखेड येथे चार गटांत झालेल्या निवडणुकीत सहकारी संस्था गटातून ११ जागांपैकी महाविकास आघाडी पॅनलने ५ व बळीराजा सहकार पॅनलने ६ जागांवर विजय मिळविला. ग्रामपंचायत गटात ४ पैकी चारही जागांवर महाविकास आघाडी पॅनलला विजय मिळाला. अडते व व्यापारी गटात २ जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडी पॅनल व एका जागेवर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. हमाल व मापाडी गटातून एका जागेवर स्वतंत्र उमेदवार विजयी झाला.

काटोल बाजार समितीकाटोल येथे सहकारी संस्था गटाच्या ११ जागांपैकी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलच्या एकाही उमेदवाराला खाते उघडता आले नाही. येथे भाजप समर्थित शेतकरी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायत गटात ४ पैकी ३ जागांवर शेतकरी उत्कर्ष पॅनलने बाजी मारली. येथे एक जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाली. मात्र, व्यापारी अडते गटाच्या दोन्ही आणि मापाडी गटाची एक जागा महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलने काबीज केली आहे

टॅग्स :Electionनिवडणूक