पारशिवनी : पारशिवनी तालुक्यात होऊ घातलेल्या १० ग्रा.पं.च्या निवडणुकीत महाविकास आघाडीची काय भूमिका राहील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र तालुक्यात पाच ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी एकत्र तर उर्वरित पाच ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. सोमवारपर्यंत तालुक्यातील विविध १० ग्रा.पं.साठी १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारीही तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तालुक्यात माहुली, आमगाव, ईटगाव, पिपळा व निमखेडा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी एकत्रपणे लढण्याची चिन्हे सध्यातरी आहे. तर नवेगाव खैरी, सुवरधरा, खेडी, बोरी (सिंगरदीप), खंडाळा (घटाटे) या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे एकमत होऊ शकले नसल्याची माहिती आहे. भाजपने तालुक्यातील दहाही ग्रा.पं.वर लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यातील राजकारणात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एन्ट्री घेतली आहे.
पाच ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:12 IST