शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘महात्मा फुले’जनआरोग्य योजनेला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:20 IST

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चे नामांतर करून शासनाने ७ जून २०१६ रोजी ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’ला मंजुरी दिली.

ठळक मुद्देपाचव्यांदा वाढ : जीवनदायी योजनेच्या तरतुदी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चे नामांतर करून शासनाने ७ जून २०१६ रोजी ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’ला मंजुरी दिली. परंतु दीड वर्ष होऊनही शासनाकडून या योजनेची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. पाचव्यांदा नव्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. अंमलबजावणीपर्यंत ‘राजीव गांधी’ योजनेच्याच तरतुदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सुरळीत सुरू असलेली ही योजना आणखी प्रभावी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नंतर केवळ ‘राजीव गांधी’ऐवजी ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावातच बदल झाला. जुन्या योजनेत खंड न पडू देता १ एप्रिल २०१७ पासून नव्या नावाने योजना सुरू ठेवली. या योजनेला तीन महिन्याची म्हणजे ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.मात्र या योजनेचे स्वरूप व व्याप्तीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड झालीच नाही. निविदा प्रक्रियेअंती विमा कंपनी निश्चित करून योजना राबवू, असे शासनाचे म्हणणे होते. लाभार्थ्यांच्या विमा संरक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेस १ जुलै २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अजूनही प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत, १७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने नवीन योजनेस पुन्हा तीन महिने म्हणजेच ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.विमा हप्त्यावर १८ टक्के ‘जीएसटी’!‘महात्मा फुले’ योजना अंमलात येईपर्यंतच्या कालावधीत योजनेच्या सर्व लाभार्थी घटकांसाठी प्रति कुटुंब ५४० रुपये व जीएसटी (१८ टक्के) या सुधारित दराने विमा हप्ता विमा कंपनीस अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.