शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीचा महानिशिथकाल मध्यरात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:31 IST

मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून, त्या दिवशी महानिशिथकाल उत्तररात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत म्हणजे ४८ मिनिटे आहे. यावेळी श्री साबसदाशिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे म्हणजे महापुण्य मिळते, असे पुराणात सांगितल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून, त्या दिवशी महानिशिथकाल उत्तररात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत म्हणजे ४८ मिनिटे आहे. यावेळी श्री साबसदाशिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे म्हणजे महापुण्य मिळते, असे पुराणात सांगितल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.पुराणग्रंथात महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना नमूद केले आहे की, या दिवशी सायंकाळनंतर प्रत्येक प्रहराला शिवपूजन केल्यास त्या व्यक्तीला मोक्षप्राप्त होतो. या दिवशी रात्रीचा प्रथम प्रहर सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. यावेळी श्री शिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे. दुसरा प्रहर रात्री ९.२६ वाजता सुरू होईल. यावेळी श्री शंकराय नम: या मंत्रोच्चाराने पूजन करावे. तिसरा प्रहर मध्यरात्री १२.३६ वाजता राहील त्यावेळी श्री महेश्वराय नम: आणि चवथा प्रहर पहाटे ३.४५ वाजता सुरू होईल, यावेळी श्री रुद्राय नम: या मंत्रोच्चाराने शिवपूजन करावे. प्रत्येक प्रहरात शिवपूजन करताना शिवाला कमळ, पांढरी फुले, बेलाची पाने वाहावीत, त्याआधी कच्च्या दुधाने अभिषेक करावा, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.शिवोपासना शनिसोडतीवर रामबाण उपाय आहे. सध्या शनि धनु राशीतून भ्रमण करत आहे. त्यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साडेसाती तर वृषभ व कन्या राशीला छोटी साडेसाती म्हणजे अढ्या चालू आहे. या राशीच्या व्यक्तींनी जरूर महाशिवरात्रीला उपवास करून शास्त्रोक्त पद्धतीने शिवपूजन करावे, असा डॉ. वैद्य यांचा सल्ला आहे.ज्यांना विविध कारणांमुळे शिवरात्रीचा उपवास करणे शक्य नसेल त्यांनी श्री शिवमहिमा स्त्रोत, श्री शिवलिलामृतचा कमीत कमी एक अध्याय तज्ज्ञ ज्योतिष्यांच्या सल्ल्याने वाचावा. शिवलिलामृताच्या प्रत्येक अध्याय वाचनामुळे वेगळी फलश्रुती प्राप्त होते. या दिवशी महामृत्यूंजय जप किमान १०८ वेळा करावा. तसेच २१, ५१, १०८ वेळेस ‘ओम नम: शिवाय’ हा जप करावा, त्यानी निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते, असे ज्योतिषाचार्य डॉ. वैद्य यांनी कळविले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर