रामटेक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रामटेक शाखेची विशेष बैठक रामटेक शहरात मंगळवारी (दि. २) पार पडली. त्यात तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
यात तालुकाध्यक्षपदी विनिता आष्टनकर, उपाध्यक्षपदी कांचन धानाेरे, कार्याध्यक्षपदी दीपा चव्हाण यांची निवड करण्यात आली असून, प्रधान सचिवपदी शुभा थुलकर, कायदेविषयक सल्लागारपदी प्रफुल्ल अंबादे, उपक्रम कार्यवाहपदी सविता डाेंगरे, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रकल्प कार्यवाहपदी स्वाती डाेंगरे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाहपदी शाेभा राऊत, वार्तापत्र विभाग कार्यवाहपदी राहुल पेटकर, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाहपदी ममता चौधरी, प्रकाशने वितरण कार्यवाहपदी दुर्गा डाेंगरे, युवा सहभाग कार्यवाहपदी महेंद्र दिवटे, महिला सहभाग कार्यवाहपदी नीलिमा राऊत, निधी संकलन कार्यवाहपदी सरला नाईक, साेशल मीडिया विभाग प्रमुखपदी अंशुमन गजभिये व जाती अंत संकल्प विभाग प्रमुखपदी संजू नैताम यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्चना मेश्राम हाेत्या. जागतिक महिला दिन साजरा करणे, हाेळी लहान साजरी करणे, पुरणपाेळी दान करणे यासह अन्य समाजाेपयाेगी उपक्रम राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
संचालन व आभार प्रदर्शन शाेभा थुलकर यांनी केले. बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित हाेते.