शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य विकसित पण विकास असमतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:09 IST

महाराष्ट्र राज्याने खूप प्रगती केली आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. परंतु हा विकास असमतोल असा आहे. धोरणे राबवताना येथील संसाधनांचा योग्य उपयोगच झालेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील २० टक्के लोकांकडे तब्बल ८५ टक्के संपत्ती आहे. त्यामुळे या विकासाचा येथील गरिबांना कुठलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देसुखदेव थोरात यांची पत्रपरिषद असोसिएशन फॉर सोशल अ‍ॅण्ड इकोनॉमिक इक्वॅलिटीचा अहवाल

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र राज्याने खूप प्रगती केली आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. परंतु हा विकास असमतोल असा आहे. धोरणे राबवताना येथील संसाधनांचा योग्य उपयोगच झालेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील २० टक्के लोकांकडे तब्बल ८५ टक्के संपत्ती आहे. त्यामुळे या विकासाचा येथील गरिबांना कुठलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्यातील विकासाचे हे वास्तव विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व सामाजिक व आर्थिक समता संघ (असोसिएशन फॉर सोशल अ‍ॅण्ड इकोनॉमिक इक्वॅलिटी) या अराजकीय संघटनेचे संस्थापक डॉ. सुखदेव थोरात यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत मांडले.डॉ. सुखेदव थोरात यांनी सांगितले की, सामाजिक व आर्थिक समता संघ हे अखिल भारतीय स्तरावरील अराजकीय सामाजिक संघटना आहे. शोषित समाजघटकांच्या समस्यांची जाणीव जागृती समाजात वाढविणे, त्यांच्या गरिबी व मानवी अधिकारांच्या हननांची तसेच त्यांच्या उपेक्षिततेची कारणे शोधणे, प्रकाशित दस्ताऐवजांच्या माध्यमातून धोरणे तयार करून त्यावर उपाय सुचविणे व शासकीय योजनांचा समाजातील योग्य व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी प्रारूप विकसित करणे हे संघटने मुख्य कार्य आहे. महाराष्ट्रातील दलितांची स्थिती यावर अभ्यास करण्याचे कार्य संघटनेला मिळाले होते. परंतु संघटनेने महाराष्ट्रातील एकूण विकासाची स्थिती आणि त्यातही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम व एकूणच समाजघटकांच्या विकासाची स्थिती यावर तब्बल तीन वर्षे सर्वांगिण अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे.या अभ्यासामध्ये उपरोक्त बाब दिसून आली आहे. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र देशात नंबर १ आहे. परंतु गरिबी, कुपोषण व शिक्षण या ह्युमन इंडिकेटरचा विचार केल्यास महाराष्ट्र हे देशातील अनेक मागासलेल्या राज्यांपेक्षा खूप मागे असल्याचे दिसून येते.गरिबीमध्ये महाराष्ट्राचा ६ वा नंबर, शिक्षणात १० वा तर कुपोषणामध्ये १६ वा नंबर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये मागास असलेल्या अनेक राज्यांची स्थिती शिक्षण, गरिबी व कुपोषणाबाबत चांगली आहे. याच विकासामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम व उच्च वर्णीयांचा विचार केल्यास दलित आदिवासींची स्थिती ओबीसींमध्ये वाईट आहे. ओबीसी दलित-आदिवासींमध्ये चांगले असले तरी उच्चवर्णीयांपेक्षा त्यांची स्थिती वाईट आहे. मुस्लीमांची आर्थिक परिस्थिती दलित-आदिवासीपेक्षा थोडी चांगली असली तरी शिक्षणात ते माघारलेले आहे, असा एकूणच विकासाचा असमतोल दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पत्रपरिषदेला डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. एम.एल. कासारे, डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. गौतम कांबळे आदी उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते होणार उद्घाटनसामाजिक व आर्थिक समता संघाचे अधिकृत उद्घाटन माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासहेब आंबेडकर सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेने जाहीर केलेल्या अहवालांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात येईल. महाराष्ट्रातील गरिबी, असमानता व सामाजिक भेदभाव यावर दिवसभर चर्चासत्र होईल.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र