शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सुटणार  : प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:03 IST

: गोंदियावरून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : गोंदियावरून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूरवरून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस १०, १७ फेब्रुवारी रोजी गोंदियाऐवजी वर्धा रेल्वे स्थानकावर समाप्त होणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून ५, १२ आणि १९ फेब्रुवारीला दुपारी १२.१३ वाजता सुटेल. यामुळे या गाडीने कोल्हापूरला जाणाऱ्या गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूरच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.दुरांतो ९ फेब्रुवारीपर्यंत अजनीवरून सुटणारनागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर वॉशेबल अ‍ॅप्रानचे काम सुरू आहे. त्यासाठी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस २ फेब्रुवारीपर्यंत अजनी रेल्वे स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. परंतु वॉशेबल अ‍ॅप्रानचे काम पूर्ण न झाल्यामुळे ही गाडी९ फेब्रुवारीपर्यंत अजनीवरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.