महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सुटणार  : प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:02 PM2020-02-03T22:02:21+5:302020-02-03T22:03:27+5:30

: गोंदियावरून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Maharashtra Express will depart from Wardha instead of Gondia: inconvenience of passengers | महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सुटणार  : प्रवाशांची गैरसोय

महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सुटणार  : प्रवाशांची गैरसोय

googlenewsNext
ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : गोंदियावरून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूरवरून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस १०, १७ फेब्रुवारी रोजी गोंदियाऐवजी वर्धा रेल्वे स्थानकावर समाप्त होणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून ५, १२ आणि १९ फेब्रुवारीला दुपारी १२.१३ वाजता सुटेल. यामुळे या गाडीने कोल्हापूरला जाणाऱ्या गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूरच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

दुरांतो ९ फेब्रुवारीपर्यंत अजनीवरून सुटणार
नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर वॉशेबल अ‍ॅप्रानचे काम सुरू आहे. त्यासाठी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस २ फेब्रुवारीपर्यंत अजनी रेल्वे स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. परंतु वॉशेबल अ‍ॅप्रानचे काम पूर्ण न झाल्यामुळे ही गाडी
९ फेब्रुवारीपर्यंत अजनीवरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: Maharashtra Express will depart from Wardha instead of Gondia: inconvenience of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.