शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी, सरकार घेते टक्केवारी, विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक

By मंगेश व्यवहारे | Updated: December 8, 2023 12:31 IST

Maharashtra Assembly Winter Session: अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायथ्याशी शुक्रवारी धरणे देत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

- मंगेश व्यवहारेनागपूर  - अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायथ्याशी शुक्रवारी धरणे देत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादार दानवे, अशोक चव्हाण, अनिल देशमुख, नाना पटोले, अभिजित वंजारी, रवींद्र वायकर, सचिन अहिर आदींचा सहभाग होता. यावेळी दानवे म्हणाले,‘कापूस, धान आणि सोयाबीनला भाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे. दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा खोटी आहे. सरकार फक्त आकडेवारी फेकते आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरालगतच्या शेतात गेले पण त्यातून काहीही साध्य झालेले नाही. ज्यावेळी जायचे होते तेव्हा ते तेलंगणच्या निवडणुकीत प्रचार करण्यात व्यस्त होते.

आम्ही सभागृहात कापूस, धान, सोयाबीनला भाव मिळावा यासाठी संघर्ष करू. आंदोलनात कापसाच्या माळा घालून आमदारांनी ‘अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पंचनामे करणारे सरकार सुस्त,’ ‘अवकाळीने निघते शेतकऱ्यांचे दिवाळे, गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे,’ ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा सागर, सरकार देते नुसते गाजर,’ अशा लक्षवेधक घोषणा दिल्यात. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार