शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:59 IST

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मतदारसंघात ...

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मतदारसंघात भव्य रॅली काढत प्रचाराच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. क्षेत्रातील मतदारांना अभिवादन करीत त्यांनी मतांसाठी साकडे घातले.बसपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार अ‍ॅड. वीरसिंह यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी हिरवी झेंडी दाखवत साखरे यांच्या रॅलीला रवाना केले. इंदोरा चौक येथून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख वस्त्यांमध्ये फिरत खुल्या जीपमध्ये बसलेल्या सुरेश साखरे यांनी नागरिकांना अभिवादन केले. मोटरसायकल, ई-रिक्षा आणि अनेक कारचा ताफा रॅलीसोबत चालला होता. रॅलीदरम्यान झालेल्या गर्दीने बसपा कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे. यावेळी प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, जितेंद्र घोडेस्वार, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाणे, उत्तम शेवडे, किशोर कॅथेल, जिल्हा प्रमुख उषाताई बौद्ध, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, शहराध्यक्ष महेश सहारे, पक्षनेता वैशाली नारनवरे, माजी पक्षनेता गौतम पाटील, सभापती वीरंका भिवगडे, माजी सभापती चांदेकर, महिला नेता रंजना ढोरे, राजेश नंदेश्वर, संजय जैस्वाल, बुद्धम राऊत, नरेंद्र वालदे, योगेश लांजेवार, नितीन शिंगाडे, तपेश पाटील, रंजित सहारे, प्रताप सूर्यवंशी, विकास नागभिडे, देवेंद्र वाघमारे, मोहम्मद इब्राहिम टेलर आदी आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpur-north-acनागपूर उत्तर