शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : खुल्या प्रवर्गासाठी आणखी जागा वाढविणार  : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:33 IST

गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देगुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व समाजातील मुलेमुली शिकली तर देशाला पुढे घेऊन जातील. विविध समाजाला सवलती मिळायच्या, मात्र खुल्या प्रवर्गाला कुठलेही आरक्षण नव्हते. २०१८ पूर्वी जेवढ्या जागा खुल्या प्रवर्गाला मिळत होत्या, तेवढ्याच जागा विविध संस्थांमध्ये वाढविण्याचा आमच्या सरकारने निर्णय घेतला. यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही व गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या फडणवीस यांनी बुधवारी प्रतापनगर चौकाजवळ प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.यावेळी महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजासाठी वेगळे मंत्रालय सुरु केले व ३५०० कोटींचा निधी दिला. तर खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक विकास महामंडळ बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली. या विद्यार्थ्यांनादेखील परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. खासगी महाविद्यालयांतील ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती होते. ६०२ अभ्यासक्रमांत सर्व समाजांतील विद्यार्थ्यांना मदत होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.‘मेट्रो’च्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी मिळणारयंदाच्या निवडणूका या ऐतिहासिक राहणार आहेत. कारण जनतेला याचा निर्णय अगोदरपासूनच माहीत आहे. विरोधकांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. महाराष्ट्रासोबतच नागपुरातही नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन झाले आहे व विकासाची मालिकाच सुरू झाली आहे. १९९५ मध्ये आम्ही ‘मिहान’ची संकल्पना मांडली. १९९९ नंतर १५ वर्षे काहीच झाले नाही. उद्योग यावेत यासाठी आम्ही विशेष ‘इन्सेन्टिव्ह’ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुंतवणूक येत आहे. ‘मेट्रो’च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रस्तावदेखील केंद्राकडे मंजुरीकडे पाठविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.राहुल गांधी यांच्यामुळे भाजपचा फायदाचआपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनादेखील चिमटे काढले. कॉंग्रेसने राहुल गांधी यांची प्रत्येक मतदारसंघात सभा आयोजित करावी. कारण ते जेथे जातात तेथे भाजपचा विजय होतो व मताधिक्य दुप्पट होते. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची स्थिती त्यांना माहीत आहे. कॉंग्रेसला यावेळी ४२ काय २४ जागादेखील मिळणार नाहीत. त्यामुळे ते प्रचारासाठी फारसे आले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झुडपी जंगलांवरील रहिवाशांना मालकी मिळणारनागपुरातील एकात्मतानगर, तकिया येथील झुडपी जंगलांवर अनेकांची घरे आहेत. त्यांना मालकी हक्क मिळू शकत नव्हता. आम्ही केंद्राकडे गेलो व  निर्णय करून घेतला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलो. लवकरच यासंबंधातील अहवाल सर्वोच्च न्यायालय स्वीकारणार आहे. यानंतर झुडपी जंगलांवरील रहिवाशांना मालकी हक्क पट्टे मिळतील. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील झुडपी जंगलांवर राहणारे आपल्या जमिनीचे मालक होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम