शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मतदानासाठी इटलीहून आले माई गुरुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:19 IST

२२ वर्षांपूर्वी नागपूर सोडून इटलीत स्थायिक झालेले माई गुरुजी ऊर्फ महेंद्र सिरसाट यांनी सोमवारी महापालिकेच्या मतदान केंद्रावर मतदान केले.

ठळक मुद्देबदललेले नागपूर पाहून गर्व : आयुष्यात पहिल्यांदा केले मतदान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : २२ वर्षांपूर्वी नागपूर सोडून इटलीत स्थायिक झालेले माई गुरुजी ऊर्फ महेंद्र सिरसाट यांनी सोमवारी महापालिकेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान करण्यासाठी इटलीहून नागपूर गाठणाऱ्या माई गुरुजी यांनी शहराचा झालेला कायापालट पाहून मतदान करताना गर्वाची अनुभूती होत असल्याची भावना लोकमतजवळ व्यक्त केली.ईटलीतील लोकांना भारतीय संस्कृती शिकविणारे माई गुरुजी हे त्या देशात भारताचे युवा गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. २२ वर्षांपूर्वी त्यांनी नागपूर सोडले होते व थेट इटली गाठली. तेथे संघर्ष करीत आध्यात्मिक गुरू म्हणून नाव कमावले. माई गुरुजी दरवर्षी तेथील लोकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी त्यांना घेउन भारतात येतात. नागपूरला सीताबर्डी येथे त्यांचे घर आहे. त्यांची पत्नी इटालियन आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही ते कुटुंबासह दिवाळी सणासाठी २५ आॅक्टोबरला नागपूरला येणार होते. मात्र निवडणूक असल्याची माहिती मिळताच १७ तारखेलाच नागपूर गाठले. पत्नी व त्यांचा मुलगा २५ रोजी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा मतदानही केले. आपल्या शहराचा कायापालट झाला आहे आणि हे दृश्य पाहून गर्व वाटत असल्याची भावना व्यक्त केली. बºयाच वर्षाने भारतातील निवडणुकीचा अनुभव घ्यायचा होता आणि त्या कारणाने पहिल्यांदा मतदान केल्याचाही आनंद झाल्याचे ते म्हणाले. आपण इटलीहून येऊन मतदान केले, मात्र शहरात केवळ ५१ टक्के मतदान झाल्याची बातमी पाहून मतदानाविषयी लोकांच्या उदासीनतेबाबत खंत वाटत असल्याचीही भावना व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ItalyइटलीVotingमतदानnagpurनागपूर