शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

Maharashtra Assembly Election 2019 : तुमच्यावरील संकटाचा मी सामना करील : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:20 IST

आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला.

ठळक मुद्दे पश्चिम नागपुरात पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पायाभूत सुविधांचा विकास करणे, नागरी समस्या सोडविणे हे तर लोकप्रतिनिधीचे काम आहेच. मात्र, आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला.विकास ठाकरे यांची पश्चिम नागपुरातील बोर नाला, नर्मदा, वृंदावन कॉलनी, वीरचक्र कॉलनी, काकर कॉलनी, स्वामी फाळके लेआऊट, वेलकम सोसायटी, गुलशन सोसायटी, मकरधोकडा, जगदीश नगर, गंगानगर, माता मंदिर, दाभा, गोरेवाडा आदी भागात पदयात्रा झाली. यावेळी ठाकरे म्हणाले, आपण नागपूरचा महापौर म्हणून मी केलेली विकास कामे पाहिली आहेत तर विरोधी पक्ष नेता म्हणून जनतेच्या विविध प्रश्नांवर केलेला संघर्षदेखील पाहिला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मी कधीही मागे हटलो नाही. कधीही जबाबदारी झटकली नाही. त्यामुळे एकदा माझ्यावर विश्वास करून संधी द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले.पदयात्रेत नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नगरसेवक दर्शनी धवड, देवेंद्र रोटेले, दीपक वानखेडे, रोशनी चांदेकर, युगल विधावत, विश्वनाथ देशमुख, आलोक मून, संतोष टेकाम, विशाल मेताम, अशुतोष ग्वालबन्सी, नीलम बनोडे, पुष्पा बवंडेकर, आरीफ खान, आदी उपस्थित होते. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी वृंदा ठाकरे यांनी गोधनी रोड येथे बैठक घेतली. झिंगाबाई टाकळी येथे पदयात्रा केली. यावेळी गजू मोपारी, जगदीश गमे, प्रणाली मानमोडे, रंजना शेंडे, आश सेंदरे, आशा राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vikas Thakreविकास ठाकरेnagpur-east-acनागपूर पूर्व