शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पूर्वमध्ये  'कृष्णा'चा रथ रोखणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 23:19 IST

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा हजारेंना हात : बसपा व वंचितच्या उमेदवारांमुळे चुरस वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आ. कृष्णा खोपडे हे विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने त्यांना आव्हान देण्यासाठी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना ‘हात’ दिला आहे. मात्र, गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खोपडे यांनी काँग्रेसचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांचा ४० हजार ४७४ मतांनी पराभव केला होता. यावेळी काँग्रेसकडून वंजारी किंवा उमाकांत अग्निहोत्री यांना तिकीट मिळेल असा अंदाज वर्तविला जात असताना, ऐनवेळी नगरसेवक पुरुपोत्तम हजारे यांना उमेदवारी मिळाली. या जागेवर राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनीही दावा केला होता. जागा राष्ट्रवादीला न मिळाल्याने तेही रुसले आहेत. बहुजन समाज पार्टीचे सागर लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे मंगलमूर्ती सोनकुसरे तर छत्तीसगड स्वाभिमान मंचतर्फे गोपालकृष्ण कश्यप यांच्यासह तीन अपक्ष असे एकूण आठ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. बसपा व वंचितच्या उमेदवारांमुळे चुरस वाढलेली असली तरी, खरी लढत भाजपाचे कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्यातच आहे.१९६७ पासून २००४ पर्यंत एकूण नऊ विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विजय मिळविला होता. १९९० पासून २००४ पर्यंतच्या चार विधानसभा निवडणुकात तर या मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश चतुवेर्दी विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाला काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानले जायचे. २००९ मध्ये खोपडे यांनी माजी मंत्री सतीश चतुवेर्दी यांचा तब्बल ३५ हजार २१६ मतांनी पराभव केला होता. आता सतीश चतुर्वेदी हे स्वत: ‘सारथी’ बनून हजारे यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. मात्र, मधली पाच वर्षे चतुर्वेदींनी दक्षिणेत घालविल्याने पूर्व भागात त्यांची जुनी पकड पाहिजे तशी राहिलेली नाही. विशेष म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर शहरातील सहा मतदारसंघांपैकी सर्वाधिक ७५ हजारांहून अधिक मताधिक्य याच मतदारसंघात मिळाले होते.खोपडे यांनी त्यांच्या मतदारसंघात सिम्बॉयसिस, ‘साई’चे केंद्र खेचून आणले. मतदारसंघातील विकास कामे व भविष्यात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता यामुळे खोपडे यांच्यासाठी यावेळीही परिस्थिती अनुकूल दिसते आहे. जातीय समीकरणांचा विचार केल्यास इथे ‘तेली’ समाजाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर ‘कुणबी’ समाजाचे मतदान आहे. ‘उत्तर भारतीय’ आणि ‘छत्तीसगडी’ मतदार तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘सिंधी-मारवाडी-गुजराती’ यासह अन्य जातीच्या मतदारांची संख्याही दखलपात्र आहे. कृष्णा खोपडे व पुरुषोत्तम हजारे दोघेही तेली समाजाचे असल्यामुळे, समाजाशिवाय इतर मुद्दे येथे अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत.एकूण उमेदवार : ८एकूण मतदार : ३,७१,८९३

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-east-acनागपूर पूर्व