शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:09 IST

महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षात राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाली असून, गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला.नागपुरात आल्या असता त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, २०१२ मध्ये निर्भया कांड घडले. या घटनेनंतर तातडीने तपास करून गुन्हेगारांचा शोध लावण्यात आला. आयोगाची स्थापना केली. कडक कायदा आणला. न्यायदानात विलंब होऊ नये म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली. त्यानंतर नवीन सरकार आले. मात्र या कांडातील गुन्हेगारांना अद्याप शिक्षा झालेली नाही.२०१४ नंतर महिलांवरील अन्याय, अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करून मुखर्जी म्हणाल्या, २०१३ मध्ये बलात्काराच्या घटनांची संख्या १ हजार ५४६ होती. ती २०१८ मध्ये ४ हजार ७६ वर पोहचली. महाराष्ट्रात मुलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांतही वाढ झाली. बेटी बचाव बेटी पढाव ही घोषणा या सरकारने केली, त्या जाहिरातीसाठी स्वत:च्या छायाचित्रांचे पोस्टर देशभर लावले, पण एकाही पोस्टरवर त्याअंतर्गत असलेल्या कायद्याची आणि गुन्ह्यांची माहिती जनतेला दिली नाही. ९२८ कोटी रुपयांची तरतूद या योजनेवर सरकारने केली, त्यातील फक्त १९ टक्के निधी राज्याला मिळाला आणि ४० टक्के निधी जाहिरातीवर खर्च केला. हे सरकार जाहिरातबाज आणि घोषणाबाज असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, उन्नाव प्रकरणात भाजपातील ज्येष्ठ नेत्याचे नाव येऊनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आणि अटक करण्यात या सरकारने विलंब का केला, याचे उत्तर जनतेला द्यावे. चिन्मयानंद यांच्याविरुद्ध तक्रारकर्तीच्या आरोपांमध्ये स्पष्ट उल्लेख असतानाही थेट बलात्काराची कलमे न लावता तसा प्रयत्न केल्याची कलमे लावली आहेत. गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ का, याचे उत्तर भाजपाने देशाला द्यावे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसWomenमहिलाGovernmentसरकारMediaमाध्यमे