शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Maharashtra Assembly Election 2019 : उद्या मतदान उत्सुकता व दडपण : १२ जागांसाठी १४६ उमेदवार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:05 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सकुता असून, उमेदवारांवर मात्र दडपणही आले आहे.

ठळक मुद्दे४,४१२ केंद्रांवर पार पडणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सकुता असून, उमेदवारांवर मात्र दडपणही आले आहे.मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील १२ मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण १४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २१ ऑक्टोबर रोजी ४ हजार ४१२ मतदान केंद्रांवर ४१ लाख ७१ हजार ४२० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकाच मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदार झाल्याने, ३० सहायक मतदान केंद्रे नव्याने केली आहेत तर इमारती जीर्ण झाल्याने, आवश्यक सुविधा नसल्याने १० ठिकाणी मतदान केंद्र बदलले आहेत. याशिवाय ४,४१२ मतदान केंद्रांपैकी ४४० मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. यामध्ये ५५ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे. शिवाय संवेदनशील मतदान केंद्रांच्या १० टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे जिल्ह्यात १२ सखी मतदान केंद्र असणार आहेत. या केंद्रात मतदान कर्मचाऱ्यांपासून तर पोलिसांपर्यंत सर्वच महिला राहतील, हे विशेष. यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारासांठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.दिव्यांग मतदारांकडून भरून घेणार‘फिड बॅक फॉर्म’पारदर्शक, निर्भीड वातावरणनिर्मितीतून १०० टक्के मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदा कंबर कसली आहे. त्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदलही केले असून, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका, अनुक्रमांकाचे स्टीकर अन् दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी मागणीनुसार वाहनांची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रांवर आवश्यक सर्व सोयीसुविधाही पुरविण्यात येईल. मतदान केंद्रांवर पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘फिड बॅक फॉर्म’ही दिव्यांग मतदारांकडून भरून घेण्यात येईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान