शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : बसपातर्फे सुरेश साखरे यांच्यासह १२ ही उमेदवारांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:53 IST

बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली.

ठळक मुद्देशेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायमएकेका उमेदवाराने जाऊन भरले अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली.बसपाच्या उमेदवारंनी यादी शेवटपर्यंत जाहीर झाली नाही. शेवटच्या केवळ प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे उत्तर नागपूरचे उमेदवार राहतील, इतकीच एक घोषणा एक दिवसापूर्वी झाली. परंतु उर्वरित ११ ही उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही माहीत नव्हती. ती नावे उमेदवारी सादर केल्यानंतरच जाहीर झाली. शेवटच्या दिवशी सुरेश साखरे यांनी उत्तर नागपूर, पूर्व नागपूरमधून सागर लोखंडे, पश्चिम नागपूर फारुख अफजल, दक्षिण नागपूर- शंकर थूल, दक्षिण- पश्चिम नागपूर - विवेक हाडके, मध्य नागपूर -डॉ धर्मेंद्र मंडलिक, उमरेड - संदीप मेश्राम,) हिंगणा - राहुल सोनटक्के, रामटेक - संजय सत्येकार, कामठी - प्रफुल्ल माणके, सावनेर - संचयिता पाटील, काटोल - मो. शफी (सूफी बाबा) यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.तत्पूर्वी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज सादर करण्यासाठी पक्षातर्फे संविधान चौक येथे कार्यकर्त्यांनी दुपारी १२ वाजता बोलावण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व उमेदवार मिळून रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करायला जातील, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. कार्यकर्ते संविधान चौकात एकत्र आले. परंतु सुरेश साखरे सोडले तर इतर मतदार संघातील उमेदवार कोण, हे कुणालाही माहीत नव्हते. काही लोकांना फॉर्म भरून तयार राहण्यास सांगण्यात आले होते. त्यांना फोन करून वेळेवर बोलावले जात होते. त्यानुसार ज्याला फोन आला त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन फॉर्म भरले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी