शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नागपुरातील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:58 IST

बालगोपाल आणि शहरातील पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन घडविणारे महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोरोनामुळे सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ते बंद ठेवले जाणार आहे.

ठळक मुद्देअनिश्चित काळासाठी बंदकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालगोपाल आणि शहरातील पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन घडविणारे महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोरोनामुळे सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ते बंद ठेवले जाणार आहे.केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश १६ मार्चपासून अमलात आणायचा असला तरी प्रत्यक्षात रविवारीपासूनच या प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागलेले दिसले. रविवार सुटीचा दिवस असल्याने या ठिकाणी गर्दी होते. मात्र कुलूप पाहून आणि प्रवेशद्वारावरील सूचना वाचून सर्वांनाच परत जावे लागले.महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, या प्राणिसंग्रहालयात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. देशातील कोरोनाची आपदा लक्षात घेता, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालये बंद करण्याचे आदेश १३ मार्चच्या पत्रातून दिले होते. महाराजबाग प्राणिसंग्रहालयालाही हे पत्र मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.शहरामध्ये वन विभागाने निर्माण केलेले बालोद्यान आणि जपानी गार्डनही आहे. तिथेही पर्यटकांची दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र या दोन्ही ठिकाणी बंदीचा आदेश अमलात आणलेला नाही. यासंदर्भात जिल्ह्याचेउपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांना विचारणा केली असता, संबंधित समितीच्या बैठक ीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस