शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी जगदंबा देवस्थान घेणार अनाथांचे पालकत्व;  कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना मदत

By कमलेश वानखेडे | Updated: May 27, 2023 18:51 IST

Nagpur News कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

कमलेश वानखेडेनागपूर : कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे अनाथ बालकांचे भविष्य घडविण्यासाठी मंदिर प्रशासनासह दानदात्यांचाही हातभार लागणार आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या शनिवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थानाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेच्या अमलबजावणीचा प्रस्ताव एकमताने पारित केला. यावेळी संस्थानाचे उपाध्यक्ष नंदूबाबू बजाज, सचिव दत्तूची समरीतकर, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, प्रभाताई निमोने, केशवराव महाराज फुलझेले, अजय विजयवर्गी, अशोक खानोरकर, प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, लक्ष्मीकांत तडस्कर, ॲड. मुकेश शर्मा उपस्थित होते.

या बालकांचे स्वीकारले पालकत्व

संकेत किशोर बंधिया (देवलापार), अमन अंकुश हिरकने (देवलापार), प्रणाली किशोर बांधिया (देवलापार), दीक्षा अंकुश हिरकने (देवलापार), रोहिणी विजय चव्हाण (महादुला)श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संस्थानाने उचललेले हे पाऊल भविष्याचा दृष्टीने मोलाचे पाऊल ठरणार आहे. ज्यातील एक महत्त्वाचे संस्थान या नात्याने आपले समाजाला काहीतरी देणं लागते या भावनेतून देवस्थानचे काम सुरू आहे.

- चंद्रशेखर बावनकुळे

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे