शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाजनकोचा विदर्भावर अन्याय : प्रशांत पवार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 21:50 IST

राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे.

ठळक मुद्देरोजगाराच्या संधीवर गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे. यामुळे विदर्भातील तरुण इंजिनिअर व बेरोजगारांवर अन्याय केला असून रोजगारांच्या संधीवर गारपीट आणली आहे, असा आरोप जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.महाराष्ट्रात वीज निर्मिती करणाऱ्या राज्य शासनाच्या महाजनको या कंपनीकडून वीज निर्मितीसाठी डब्ल्यू.सी.एल.,एस.ई.सी.एल.(कोरबा छत्तीसगड) व एम.सी.एल.(संबलपूर-ओडिशा) येथून कोळसा विकत घेतला जातो. महाजनको यांच्याकडून दरवर्षी सुमारे २२ मिलियन मेट्रिक टन कोळसा विकत घेते. २०११ पूर्वी महाजनको वीज निर्मितीसाठी न धुतलेला कोळसा वापरत होती. परंतु पर्यावरण विभागाने निर्बंध घातल्याने वॉशरीजचा कोळसा वापरण्याचा निर्णय घेतला. यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कंपनीने वॉशरीजमधील कोळसा पुरववठ्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी एम.एस.एम.सी. च्या मुख्यालयात प्री -बिडिंग मिटींग घेण्यात आली. यामध्ये ११ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु निविदेतील जाचक अटी व शर्थीमुळे फक्त दोन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार टेक्निकल व फायनान्शियल बीड उघडण्यात आले. यात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राच्या बाहेरील कंपन्यांना काम देण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. महाजनकोने वॉश कोळसा वापरण्यासाठी डिझाईन केले आहे का, यामुळे वीज निर्मितीत वाढ झाली आहे का, पर्यावरण विभागाने वॉशरिजची परवानगी देताना पाणी वापराचा अभ्यास केला आहे का, जगात पाण्याचा वापर न करता ळसा स्वच्छ केला जातो. असा करार का  करण्यात आला नाही. वॉश कोळशामुळे वीज निर्मितीत काही प्रमाणात वाढ होत असली तरी त्यामुळे आर्थिक भूर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांनाच सोसावा लागणार आहे. सर्वबाबींचा विचार करता कोलवॉशचा निर्णय चुकीचा आहे. याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली. यावेळी विजय शिंदे,अरुण वनकर, मिलींद महादेवकर, शेखर शिरभाते, हरीष नायडू , रवींद्र इटकेलवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prashant Pawarप्रशांत पवारMediaमाध्यमे