शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

परराज्यांना वीज विकण्याचा महाजेनकोचा बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:49 IST

ज्या राज्यातील विजेची मागणी २०,७०० मेगावॅट आणि उत्पादन क्षमता केवळ १३,६०२ मेगावॅट आहे त्या राज्यातील शासकीय कंपनी इतर राज्यांना वीज विकेल. हे ऐकायलाच विचित्र वाटते. परंतु ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देराज्याचीच गरज भागेना उत्पादन क्षमता १३,६०२ मेगावॅट, राज्याची मागणी २०,७०० मेगावॅट

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या राज्यातील विजेची मागणी २०,७०० मेगावॅट आणि उत्पादन क्षमता केवळ १३,६०२ मेगावॅट आहे त्या राज्यातील शासकीय कंपनी इतर राज्यांना वीज विकेल. हे ऐकायलाच विचित्र वाटते. परंतु ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील वीज उत्पादक कंपनी महाजेनकोने अशीच इच्छा व्यक्त केली आहे. कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे विजेचा व्यापार करण्याची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळाल्यास महाजेनको इतर राज्यांना आपली वीज विकू शकेल.ऊर्जा क्षेत्राचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून विजेचे वितरण, उत्पादन आणि पारेषण अशा वेगवेगळ्या कंपन्या गठित केल्या.महावितरणकडे वीज पुरवठ्याची जबाबदारी आहे तर महाजेनकोकडे आवश्यक विजेचे उत्पादन करण्याची जबाबदारी आहे. परंतु राज्यातील विजेची मागणी आणि उत्पादन यांच्यात बरीच तफावत आहे. उदाहरणार्थ मुंबई वगळता राज्यात सरासरी मागणी २०,७०० मेगावॅट इतकी असते तर पावसाळ्यात ती १५,६०७ मेगावॅटपर्यंत येते. दुसरीकडे महाजेनकोची एकूण उत्पादन क्षमता केवळ १३,६०२ मेगावॅट इतकी आहे. सरासरी ८ ते १० हजार मेगावॅट वीज महावितरणला उपलब्ध करून दिली जाते. उर्वरित विजेसाठी महावितरणला केंद्रीय ग्रीडसह खासगी क्षेत्राची मदत घ्यावी लागते. अशा कमजोर परिस्थिीतीतही महाजेनकोने वीज व्यापाराची परवानगी मागितली आहे. नियामक आयोग याबाबत नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारी, आक्षेप आणि सूचनानंतर यावर निर्णय घेईल.

केंद्र-खासगी क्षेत्राचे सहकार्यराज्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला महाजेनकोशिवाय केंद्र आणि खासगी क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. केंद्रीय ग्रीडकडून ४८०० मेगावॉट वीज घ्यावी लागते. त्यचप्रकारे अदानी वर्धा पॉवर, जीएसडब्ल्यू, रिलायन्स, जिंदल, धारीवाल यांसारख्या कंपन्यांकडून ४५०० मेगावॉट वीज मिळते. खासगी क्षेत्रातील करारानुसार कमी वीज घेतल्यास दंड भरावा लागतो.महाजेनकोची उत्पादनक्षमताऔष्णिक वीज- १०,१७० मेगावॅटसौरऊर्जा- १८० मेगावॅटगॅस- ६७२ मेगावॅटपवन ऊर्जा- २५८० मेगावॅटएकूण- १३,६०२ मेगावॅट 

टॅग्स :mahavitaranमहावितरण