शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महादेवाची मंदिरे गेली पाण्याखाली ! लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:28 IST

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची वाढ रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची वाढ रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली. तसेच, या समितीने येत्या १५ दिवसांत बैठक आयोजित करून लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे, याची कारणे शोधावी आणि त्यावर उपाययोजना निर्धारित कराव्या, असे निर्देश दिले.

समितीमध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी यांचा सचिव म्हणून तर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, व्हीएनआयटी प्रतिनिधी, ज्येष्ठ अॅड. आनंद परचुरे, या प्रकरणातील न्यायालयमित्र अॅड. मोहित खजांची आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. बेसाल्ट खडकांवर पडलेल्या उल्केमुळे तयार झालेले हे जगातील दुर्मीळ 'मेटिओराइट क्रेटर' मानले जाते. या सरोवराचे संशोधनासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्व आहे. परंतु, सध्या हे सरोवर पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. परिणामी, आसपासच्या जैवविविधतेचे अस्तित्व मिटण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. महादेवाची मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. पूर्वी पूर्ण दिसणारी मंदिरासमोरील दीपमाळ अर्ध्यावर पाण्याखाली गेली आहे. परिणामी, न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे.

जैवविविधता हेरिटेज स्थळाचा दर्जा ?

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता कायद्यातील कलम ३७अनुसार शिफारस केल्यास राज्य सरकार लोणार सरोवराला जैवविविधता हेरिटेज स्थळाचा दर्जा देऊ शकते. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता यावर येत्या ६ मेपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश जैवविविधता मंडळाला दिले. याशिवाय, न्यायालयाने या प्रकरणात वन विभागाला प्रतिवादी करून घेतले. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Temples Submerged! Why is Lonar Lake's Water Level Rising?

Web Summary : The High Court formed a committee to investigate the rising water level in Lonar Lake. The panel will identify causes and solutions within 15 days. Temples are submerged, raising concerns about biodiversity and heritage status.
टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारbuldhanaबुलडाणाnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय