शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रेक्षकांनी जाणले अक्षरांच्या शैलीचे चुंबकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:27 IST

जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.

ठळक मुद्देजयंत गायकवाड यांचे मार्गदर्शन : अनादी चित्रप्रदर्शनातील उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे आयोजित अनादी या कलासृजन चित्रप्रदर्शनात शनिवारी जयंत गायकवाड यांनी अक्षरांच्या निर्मितीचे कलाभाष्य केले. मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात लागलेल्या चित्रप्रदर्शनात सहभागी असलेले चित्रकार अरुण मोरघडे, नाना मिसाळ व दीनानाथ पडोळे यांच्यासह प्रसिद्ध नकलाकार राजाभाऊ चिटणीस, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, ललित कला विभागाच्या प्रमुख मुक्तीदेवी मोहिते, संयोजक दिलीप पनकुले, सहसंयोजक संजय पुंड यांच्यासह कलावंत आणि कला संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रप्रदर्शनातील हे आयोजन खरोखर अनोखे ठरणारे होते. जयंत गायकवाड यांनी अतिशय मार्मिक शब्दात शैलीदार अक्षरांच्या निर्मितीची कथा मांडली. इंग्रजी भाषेत अक्षरांच्या शैलीची विपुलता आहे, मात्र मराठीत खूप कमी फॉन्ट असल्याची खंत होती. पुस्तकांच्या मुखपृष्ठ डिझाईनसाठी विविध शैलीच्या अक्षरांची गरज पडायची व यातून अशाप्रकारच्या शैली निर्माण झाल्या. माणूस म्हटला की राग, लोभ, मोह, माया लागून आहेत. अशा प्रत्येक भावनेनुसार अक्षरे वळली तर? क्रोध, आनंद व्यक्त करणारी, कधी नाजूक क्षण उलगडणारी, सावली पडलेली, धावणारी, अलंकारिक, एकमेकात गुंतलेली तर कधी साधी आणि सरळ अक्षरे पाहताना प्रत्येक जण त्याकडे ओढला जातो. अशा शैलीदार अक्षरांची कहाणी गायकवाड यांनी मांडली. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, हे आयोजनही सर्वांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. विशेषत: चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे होते.बिजय बिस्वाल यांनी उधळले जलरंगचित्रप्रदर्शनात आलेल्या कलारसिक आणि कलेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध चित्रकार बिजय बिस्वाल यांचे प्रात्यक्षिक आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरले. रेल्वेचा कर्मचारी राहिलेला हा कलावंत कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वयंप्रेरणेने घडला आहे. जलरंगातून (वॉटर कलर) तयार केलेली त्यांची चित्रे जागतिक पातळीवर स्तुत्य ठरली आहेत. विशेषत: रेल्वेशी संबंधित त्यांची कलाकृती मोहात पाडणारी आहे. शनिवारी बिस्वाल यांनी सर्वांसमक्ष एलोरा लेण्यांचे अगदी आकर्षक असे चित्र साकारले. कलारसिकांसाठी त्यांचे प्रात्यक्षिक पाहणे एक संधी होती, पण विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणा ठरली. 

 

टॅग्स :painitingsपेंटिंगnagpurनागपूर