लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यापासूनच गडकरी आघाडीवर होते. रात्री एक नंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. अठराव्या फेरीनंतर गडकरींना ६ लाख ५२ हजार २४१ (५५.६७ %) इतकी तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांना ४ लाख ३९ हजार ११४ (३७.४८ %) इतकी मतं मिळाली. या फेरीनंतर गडकरी यांचे मताधिक्य २ लाख १३ हजार १२७ इतके होते. अखेरच्या फेरीनंतर गडकरी सुमारे २ लाख १५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
नागपुरात गडकरींच्या विकासाची जादू चालली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:55 IST
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.
नागपुरात गडकरींच्या विकासाची जादू चालली
ठळक मुद्देतुमाने यांचे सव्वा लाखाहून अधिक मताधिक्य