शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘माफसू’ला घ्याव्या लागणार सर्वच वर्षांच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:32 IST

‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देअंतिम वर्षात धरले जातात अगोदरचे गुण आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी मागे पडण्याची भीती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे ‘माफसू’तर्फे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता इतर अकृषी विद्यापीठांप्रमाणे अंतिम वर्ष सोडून इतर सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे. अद्यापपर्यंत परीक्षांबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमधील संभ्रमदेखील वाढला आहे. तर देशातील इतर पशुवैद्यकीय विद्यापीठांप्रमाणे ‘माफसू’ प्रशासनानेदेखील ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडावर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदल करण्यासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाही. यासंदर्भात देशभरातील विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले आहे. मात्र दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाही. दुसरीकडे विद्यार्थी काळजीत पडले आहेत. अखेरचे वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा न घेता थेट विद्यार्थ्यांना ‘प्रमोट’ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’च्या नियमानुसार सर्वच वर्षांच्या गुणांना सारखे महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या वर्षाची परीक्षा झाली नाही तर पुढे भविष्यात विद्यार्थ्यांना अडचण जाऊ शकते. अशास्थितीत सर्वच वर्षांची परीक्षा घेणे क्रमप्राप्त असल्याचा शिक्षकांचा सूर आहे. ‘माफसू’तील काही अधिकाऱ्यांनी इतर विद्यापीठांशीदेखील संपर्क केला. इतर विद्यापीठांनीदेखील सध्या कुठलाही अंतिम निर्णय न घेता प्रतीक्षा करण्याचाच निर्णय घेतला आहे. स्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा घेता येतील, असा सूर आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान नको‘माफसू’च्या निकालात सर्व वर्षांच्या गुणांना महत्त्व आहे. त्यामुळे सर्व वर्षांच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील काम करतात, तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी जुळतात. तेथेदेखील विद्यार्थ्यांच्या या सर्व वर्षांच्या गुण व श्रेणीला महत्त्व असते. विद्यार्थ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान व्हायला नको, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या सुधारित दिशानिर्देशांची प्रतीक्षा आहे, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ. ए.पी. सोमकुंवर यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र