शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

वाघाला पेढे खाऊ घालायचे आहे म्हणत वेड्याने महाराज बागेत उडविली धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:35 IST

वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला. अखेर तो वेडसर असल्याचे लक्षात आल्यावर त्याला सोडून देण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री महाराज बाग प्राणिसंग्रहालय बंद झाल्यावर १० वाजताच्या सुमारास एक व्यक्ती आत शिरली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर त्याला हटकण्यात आले. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याला पकडून चौकशी करण्यात आली. त्यावर, आपणास वाघाला पेढा खाऊ घालायचा आहे, मला जाऊ द्या, त्याला भेटू द्या, असे त्याने सांगितले. त्याची ही जगावेगळी मागणी ऐकून वेगळीच शंका आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यांनी तातडीने पोहचून परिस्थिती समजून घेतली. सीताबर्डी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.या दरम्यान त्या व्यक्तीच्या खिशात एक ओळखपत्र दिसले. त्यावरील क्रमांकावर संपर्क साधला असता त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. संबंधित व्यक्ती वेडसर असून बरेचदा अशा प्रकारचे कृत्य करते, असे सांगण्यात आले. त्याच्यापासून प्राणिसंग्रहालयाला काही धोका नसल्याचे लक्षात आल्यावर काही वेळाने त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान सीताबर्डी पोलीस पोहचले. मात्र ते येण्यापूर्वीच त्याला सोडून देण्यात आले होते.ही व्यक्ती महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरली होती. तिची चौकशी केल्यावर वेडसर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसात माहिती देऊन चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले.डॉ. सुनील बावसकर, प्रभारी, महाराज बाग प्राणिसंग्रहालय.यापूर्वी विमानतळावरही घातला होता गोंधळया व्यक्तीने यापूर्वी नागपूर विमानतळावर प्रवेश करून असाच गोंधळ घातल्याचे यावेळी त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबीयही तणावात असून ही दुसरी वेळ असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरTigerवाघ