शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

मध्यप्रदेशात भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसचे जोरदार कमबॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:54 IST

मध्य प्रदेशात भाजपाला ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.

गजानन चोपडेलोकमत न्यूज नेटवर्कभोपाळ : मध्य प्रदेशात भाजपाला ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मतगणनेची प्रक्रिया सुरू असून सध्या भाजपने ११० जागांवर आघाडी घेतली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ५५ जागांचे नुकसान भाजपला होत आहे. तर काँग्रेसने १०९ जागांवर आघाडी घेत जोरदार कमबॅक केले आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक भाजपाला महागात पडू शकते, असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे राजकीय गुरू आणि ज्येष्ठ संघ प्रचारक सूर्यकांत केळकर यांनी यापूर्वीच दिले होते. आजच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.व्यापंम घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेला गोळीबार त्यात ठार झालेले सहा शेतकरी, हेदेखील भाजपच्या ढासळत्या जनाधाराचे मुख्य कारण मानले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे संजय मसानी यांनी भाजपला रामराम ठोकत कॉग्रेस प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांसाठी हा पहिला मोठा धक्का होता. याशिवाय अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी केलेली बंडखोरी भाजपला भोवली. पक्षाकडून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न झाला असला तरी नाराजीचा सूर कायम होता, हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठता येईल? किंवा नाही, याबाबत खुद्द भाजप नेत्यांमध्येच साशंकता आहे. त्यामुळे कुठलाही मोठा नेता आतापर्यंत माध्यमांपुढे आला नाही. शिवाय ‘मीच सर्वात मोठा सर्वेयर’ असे म्हणणारे मुख्यमंत्रीही निकाल बघून अवाक् झाले आहेत. तिकडे गेली १५ वर्षे गटबाजीमुळे मध्यप्रदेशात तळाला आलेल्या काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांची एकजूट काँग्रेसला लाभकारी ठरली. भाजपला अपेक्षित मतांचे विभाजनही झालेले दिसत नाहीे.

 

 

 

टॅग्स :Electionनिवडणूक